शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष

By admin | Updated: December 28, 2014 02:01 IST

सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष

सिडको : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध व्यवसायांसाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून सिडको परिसरातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ कर्ज प्रकरणात फसवणूक झालेल्या काही महिलांनी अंबड पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही केली आहे़ सिडकोतील शुभम पार्कच्या एका गाळ्यामध्ये विश्वधर्म अपंग मानवसेवा संघ (रजि) ट्रस्ट संचलित नाशिक जिल्हा अपंग, विधवा, निराधार, आदिवासी पुनर्वसन केंद्र व अपंग विकास महिला औद्योगिक सहकारी संस्था लिमिटेड, नाशिक या नावाने कार्यालय सुरू करण्यात आले आहे़ या कार्यालयात विशेषत: महिलांना बोलावून जिल्हा उद्योग केंद्रातून सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले जाते़ या कार्यालयात स्वत:ला एजंट म्हणून सांगणारे भारती कानडे, सीमा खंबलवार (रा़शुभमपार्क, सिडको) व प्रतिभा यादव (रा़सावतानगर,सिडको) या तिघींनी महिलांची तसेच इतर नागरिकांची फसवूणक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ अंबड पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या दोन महिलांनी तक्रार अर्ज दिले असून, त्यात एजंटांनी जिल्हा उद्योग केंद्रातून सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज सवलतीच्या दरात देतो, असे सांगत दोघांकडून ५० लाख कर्जासाठी सुमारे सहा लाखांहून अधिक रक्कम मे २०१२ ते आतापावेतो दिल्याचे म्हटले आहे़ या कर्जासाठी जातीनुसार बँकेकडून ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत सबसिडी (सवलत) दिली जाणार असल्याचे सांगून नागरिकांकडून रक्कम जमा केली जात असे़ जिल्हा उद्योग केंद्रातून गेल्या दीड ते दोन वर्षापासून कर्ज मिळत नसल्याचे दिलेली रक्कम वारंवार परत मागूनही मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या दोन महिलांनी अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार केली आहे़ (वार्ताहर)