शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकॉन-२०१८’चे उद्घाटन : आधुनिक व प्रगत वैद्यकशास्त्र उपचार पद्धतीवर विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:50 IST

नाशिक : वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. बालकांचे विविध आजार व समस्यांवरील उपचारपद्धतींमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाची देवाणघेवाण हेच ‘नाशिकॉन-२०१८’चे यश असेल, असे प्रतिपादन ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या बालरोग ...

ठळक मुद्देमूलाग्र बदलाची देवाणघेवाण हेच ‘नाशिकॉन-२०१८’चे यश असेलउत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व पुणे विभागातून ७५० बालरोगतज्ज्ञांनी हजेरी

नाशिक : वैद्यकशास्त्र हे निरंतर संशोधनाचे शास्त्र असून, यामुळे उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत. अशा बदलांची तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती व ज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिषदांचे आयोजन महत्त्वाचे ठरते. बालकांचे विविध आजार व समस्यांवरील उपचारपद्धतींमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाची देवाणघेवाण हेच ‘नाशिकॉन-२०१८’चे यश असेल, असे प्रतिपादन ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या बालरोग संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. केदार मालवतकर यांनी केले.आधुनिक व प्रगत उपचार पद्धतीवर विचारमंथनाच्या हेतूने ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ या राष्टÑीय स्तरावरील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या वतीने शहरात दोन दिवसीय ‘नाशिकॉन-२०१८’ विभागीय परिषदेला शनिवारी (दि.२३) हॉटेल एक्स्प्रेस-इनमध्ये प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मालवतकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत रणदिवे, सचिव डॉ. अमोल पवार, रवींद्र सोनवणे, प्रशांत कुटे आदी उपस्थित होते.महागड्या वैद्यकीय सेवा स्वस्त करण्यासाठी स्वदेशी निर्मित यंत्रांचा वापरावर भर व प्रबोधन, ग्रामीण भागातील कुपोषण व मोबाइल, व्हिडीओ गेम्स, खाद्य सवयी यांचा शहरी भागातील मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासावर होणारा परिणाम, पौगंडावस्थेतील मुलांसाठी शरीर व स्वभावातील बदल, संसर्गजन्य आजारावर प्रगत उपचार व अपस्मारावरील नवीन औषधी व उपचारपद्धती यांसारख्या विषयावर वैद्यकशास्त्रानुसार मंथनाला प्रारंभ करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व पुणे विभागातून सुमारे ७५० बालरोगतज्ज्ञांनी या परिषदेला हजेरी लावली आहे. रविवारी (दि.२४) परिषदेचा समारोप होणार आहे.लघुनाटिके तून प्रबोधनडेंग्यूचे उपचार व्यवस्थापन या विषयावर डॉ. गिरीश सुब्रह्मण्यम यांनी, तर त्वचा आजारावर डॉ. वसुधा बेलगमकर यांनी माहिती दिली. यकृताशी निगडित आजार व त्यावरील उपचाराबाबत डॉ. आशा अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. नवजात अतिदक्षता विषयावर डॉ. सोनू उदानी यांनी तर अपस्मार या विषयावर डॉ. निळू देसाई यांनी उपस्थित बालरोग तज्ज्ञांना माहिती दिली. दरम्यान, दोन्ही सत्रांच्यामध्ये डॉक्टरांकडून डॉक्टर-रुग्णांचे ताणलेल्या संबंधांवर लघुनाटिका सादर करण्यात आली. या लघुनाटिकेचे दिग्दर्शन डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी, तर लेखन डॉ. मोहन वारके यांनी केले.--- 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य