शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी ही देशातील सर्व भाषांची जननी : थत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:26 IST

हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार झाले व त्यांनी या भाषेला अजून समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन एलआयसीच्या पूर्व राजभाषा अधिकारी जयश्री थत्ते यांनी केले.

ठळक मुद्देराष्टÑीय हिंदी साहित्य पुरस्कार सोहळा

नाशिक : हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार झाले व त्यांनी या भाषेला अजून समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन एलआयसीच्या पूर्व राजभाषा अधिकारी जयश्री थत्ते यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेच्या वतीने रविवारी (दि. १३) आयोजित राष्टÑीय हिंदी साहित्य पुरस्काराच्या कार्यक्रमप्रसंगी विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.अखिल हिंदी साहित्य सभा यांच्या वतीने हिंदी साहित्यिकांचा सन्मान करता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देशातून आलेल्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती गोविंद झा, अहिसासचे अध्यक्ष सुबोधकुमार मिश्र, विद्या चिटको हे उपस्थित होते. यावेळी ‘विद्याभारती’ स्मरणिकेचे प्रकाशन तसेच लेखिका सरिता सिंघाई यांच्या ‘कोहिनूर’ व वृषालिनी सानप या लेखिकेच्या ‘अश्को के मोती’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात कार्यक्रमात हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंद राज आनंद, विनय कुमार शर्मा हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हास्य कवींनी आपल्या शैलीत कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.या साहित्यिकांचा सन्मानयावेळी साहित्य साधना पुरस्कार डॉ. संकर्षण प्रजापती, विद्योतमा साहित्य सन्मान मंजूला जोशी, साहित्य शिरोमणी सन्मान राम नगीना मौर्य, साहित्य सृजन सन्मान ज्ञान चंद मर्मज्ञ, साहित्य आराधना सन्मान राजेश्वर वशिष्ठ, स्व. महादेवी वर्मा सन्मान पूनम प्रसाद, साहित्य गौरव सन्मान रामकृष्ण सहस्त्रबुद्धे, साहित्यभूषण सन्मान हा पुरस्कार पाच जणांना देण्यात आला. यात दिनेश चतुर्वेदी, अलका प्रमोद, रंजना फत्तेपूरकर, बनवारीलाल जाजोदिया, डॉ. बापूराव देसाई यांना देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी सन्मान डॉ. बाळकृष्ण महाजन यांना तर अहिसास गरिमा सन्मान मोसमी पाटील यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक