शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वावीच्या स्री स्वाभिमान केंद्राचे ‘घे भरारी‘ आरोग्य अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:49 IST

वावी : येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने अकोले तालुक्यातील टाहकरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या अंबिका विद्यालयात ...

वावी : येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने अकोले तालुक्यातील टाहकरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थेच्या अंबिका विद्यालयात ‘घे भरारी’ आरोग्य अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त वावीच्या स्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादन केंद्राच्या वतीने आदिवासीप्रवण क्षेत्रात येणाऱ्या या विद्यालयात शालेय विद्यार्थिनींची मासिक धर्मातील स्वच्छता पॅडची निकड ओळखून अभियान राबविण्यात आले. वावी येथील दिव्यांग उद्योजक रवि सुपेकर यांनी सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वितरित केले. या उपक्रमात मुख्याध्यापक गोरक्षनाथ वाकचौरे व प्रमिला एखंडे यांच्या उपस्थितीत सुपेकर यांनी पर्यावरणपूरक स्वच्छता पॅड हे रासायनिक व प्लॅस्टिकविरहित असल्याने भविष्यात उद‌्भवणाऱ्या दुर्धर रोगांपासून वाचविण्यासाठी अतिशय सुरक्षित असल्याचे सांगितले. स्री स्वाभिमान प्रकल्पाच्या वतीने रोही यांनी विद्यार्थिनींना स्वच्छता पॅडच्या उपयोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षक भाऊसाहेब साबळे, भास्कर कानवडे, भास्कर सदगीर, चंदन भारती आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

------------------

वावी येथील स्री स्वाभिमान केंद्राच्या वतीने ‘घे भरारी’ आरोग्य अभियानांतर्गत आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी दिव्यांग उद्योजक रवि सुपेकर, गोरक्षनाथ वाकचौरे, भाऊसाहेब साबळे, भास्कर कानवडे, भास्कर सदगीर, चंदन भारती यांच्यासह विद्यार्थिनी. (२८ वावी)

===Photopath===

280121\28nsk_30_28012021_13.jpg

===Caption===

२८ वावी