शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अकरा कोटींच्या अंगणवाड्यांची रखडली कामे

By admin | Updated: April 28, 2017 01:55 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील २६ पैकी २३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील २६ पैकी २३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुमारे ११ कोटींच्या अंगणवाड्यांची कामे रखडल्याचा आरोप महिला व बालकल्याण सभापती अर्पणा वामन खोसकर यांनी केला आहे.सभापती अर्पणा खोसकर यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. त्यात महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिभा संगमनेरे काम पाहत आहेत. तसेच २६ एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या २६ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांपैकी २३ पदे रिक्त आहेत. तीनच अधिकारी नियमित असून, त्यातही एका अधिकाऱ्याला हृदयविकाराचा त्रास झाल्याने ते रजेवर आहेत. कोणत्याही बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला स्वतंत्र वाहन नाही. त्यामुळे विभागाचे कामकाज गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यातच आदिवासी व बिगर आदिवासी भागातील अंगणवाड्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त असताना त्यापैकी ११ कोटींच्या अंगणवाड्यांची बांधकामे रखडल्याचे आढाव्यातून उघड झाले. त्यामुळे ही प्रलंबित अंगणवाड्यांची बांधकामे त्वरित पूर्ण करण्यासाठी लवकरच बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सभापती अर्पणा खोसकर यांनी सांगितले. तसेच बैठकीत बहुतांश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कुपोषणाची माहिती आणलेली नसल्याने त्यांना समज देऊन यापुढे बैठकीला येताना कुपोषणाची माहिती सोबत आणावी, अशा सूचना महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)