शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून दोन मजूर ठार

By admin | Updated: March 27, 2015 23:31 IST

दहा जखमी : पावसाचा तडाखा

पेठ : तालुक्यातील कायरे सादडपाडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात सादडपाडा शिवारात वीज पडल्याने दोन मजूर जागीच ठार झाले असून, अन्य दहा मजूर जखमी झाले आहेत़राजबारी - कायरे शिवारात केटी वेअर बंधाऱ्याचे काम सुरू आहे. कामावर कायरे सादडपाडा व दावलेश्वर परिसरातील मजूर काम करत असताना विजांचा अचानक कडकडाट सुरू झाला़ बचाव करण्यासाठी मजुरांनी शेजारीच असलेल्या झोपडीचा आसरा घेतला़ मात्र झोपडीवरच वीज पडल्याने सलिक कृष्णा राथड (२०) रा़ दावलेश्वर व कृष्णा सीताराम चौधरी (६५) रा़ सादडपाडा हे जागीच ठार झाले, तर सविता शिवराम राथड, सुरेखा वसंत राथड, सुनील वसंत राथड, सविता वसंत राथड, सरिता वसंत राथड, गोपाळ गोंडू गुंबाडे, सीताबाई देवराम राथड, वसंत कृष्णा राथड, नामदेव रमेश काकरे, यमुनाबाई कृष्णा चौधरी, वामन नामदेव शिंगाडे, नवनाथ रामदास पवार, माधव लक्ष्मण पवार, बेबी सीताराम शिंगाडे, मनोहर पांडुरंग जाधव यांना विजेचा तडाखा बसल्याने त्यांना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़. पोलीस निरिक्षक व्ही़ डी़ ससे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली़त्र्यंबकेश्वर : येथे शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे भाविकांची चांगलीच धावपळ उडाली. बराच वेळ विजांचा कडकडाट मात्र सुरू होता.वणी - वणी व परिसरात हलक्याशा पावसामुळे जनावरांचा चारा, गहु व हरभरा यांचे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हलक्याशा पावसाला प्रारंभ झाला . सुमारे पस्तीस ते चाळीस मिनिटे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दुपारपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यानंतर ढगाळ हवामान व पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी अस्मानी संकटापुढे हात टेकले असून ठराविक दिवसानंतर पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सुरगाणा - सुरगाणा व परिसरात आज संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान तुरळक प्रमाणात अवकाळी पाउस झाला. तालुक्यातील वाद्माल सु. व करंजुल सु.येथे गारपीठ झाली. जवळपास येथे तासभर पाऊस सुरु होता. पांडुरंग वार्डे व कृष्णा भोये यांचेसह २५ ते ३० घरावरील कौले व पत्रे उडाली.त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रावरील पत्रे उडाले. उंबरठाण, पिंपळसोंड, पळसन, खुंटविहिर, बोरीच गावठा, मालगोंदे, डोल्हारे,आम्बाठा, अलंगुण, आमदा प., बार्हे परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.गेल्या ४ - ५ दिवसापासून वातावरणात उकाडा जाणवत होता. तीन दिवसापासून येथे ३८ अंश पारा होता. (लोकमत ब्युरो)