शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

निकवेल : पंचायत समितीसह सर्व कार्यालयातही डास

By admin | Updated: September 27, 2016 00:53 IST

डासांमुळे आमदारांसह कर्मचारी हतबल

निकवेल : बागलाण पंचायत समिती सभापती कार्यालयासह इतर प्रत्येक कार्यालयामध्ये डासांचे साम्राज्य वाढलेले आहे. प्रत्येक कर्मचारी कार्यालयातील खुर्चीवर बसला की डासांचा उद्रेकामुळे त्या कर्मचाऱ्याला हातपाय झटकावे लागतात. डासांचे साम्राज्य जास्त वाढल्याने बागलाण पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पंचायत समिती सभागृहात आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पाणीपुरवठा आढावाबैठक होती. सदर बैठक संपल्यानंतर जेव्हा निघाल्या तेव्हा निकवेल येथील सरपंच रामचंद्र मोरेयांनी आमदार यांच्याकडे आमच्या गावाला ग्रामसेवक नाही तर ग्रामसेवक द्या, अशी मागणी केली. तेव्हा आमदार चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव यांच्यासह निकवेल गावचे शिष्टमंडळ हे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात गेले. आमदार चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण सह उपस्थितीत लोकप्रतिनिधी डासांच्या उपद्रवाला अक्षरश: वैतागले आणि अखेर चव्हाण यांनी वैतागून गटविकास अधिकारी कार्यालय सोडले.गेल्या कित्येक महिन्यांपासून बागलाण पंचायत समिती कार्यालयामध्ये डासांचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभाग याकडे डोळेझाक करीत आहे. बागलाण पंचायत समिती परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी पडकी जागा आहे. त्यामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामध्ये डुकरे येऊन बसलेली असतात. तसेच या भागामधील बऱ्यापैकी शासकीय कार्यालय आहेत. तेथे आलेले सारेच पंचायत समितीच्या पडक्या जागेचा वापर प्रातर्विधीसाठी करतात. पंचायत समितीमध्ये शौचालय, मुतारी हे पूर्णपणे अस्वच्छ आहे. त्यामुळे सर्वत्र डास वाढत आहेत. पंचायत समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांचे साम्राज्य असल्याने बागलाण पंचायत समिती लोकप्रतिनिधींबरोबरच कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत बागलाण पंचायत समिती आवारातील स्वच्छता करून धुराळण यंत्राद्वारे फवारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.(वार्ताहर)