शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा परिसरात चिंता

By admin | Updated: February 11, 2015 23:32 IST

खामखेडा परिसरात चिंता

खामखेडा : बेमोसमी पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. चालू वर्षी बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खामखेडा परिसरात काही ठिकाणी पाऊस झाला होता. तेव्हा कांद्याच्या रोपांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात परत वातावरणात बदल होऊन तुरळक पाऊस झाला होता, तेव्हा लागवड केलेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन पिके वाचवली होती. त्यास पंधरा-वीस दिवस झाले नाही तोच मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतातील काढणीस आलेला व शेतात काढून ठेवलेला रांगडा कांदा भिजला. आता गहू, हरभरा उन्हाळी कांदा ही पिके जोमात आहेत. परंतु बेमोसमी पावसामुळे गहू पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर अळया पडून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उन्हाळी कांद्याची उशिरा लागवड झाल्यामुळे पीक जोमात असले तरी पावसामुळे कांद्याची पात पिवळी पडून करपा रोग पडून कांदा चाळीत टिकणार नाही, तसेच कांदा बियाण्याचे डोंगळे आता बियाणे दाणे भरण्याचे मोसमात आहे, पंरतु या पावसामुळे फुलोरा गळून बियाण्यात घट निर्माण होऊन पुन्हा मागच्या वर्षीसारखी बियाणे टंचाई निर्माण होईल की काय, हा प्रश्न आता शेतकऱ्याला सतावत आहे. (वार्ताहर)