शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील ‘त्या’ पेटीत निघाली घंटा!

By admin | Updated: September 27, 2016 00:42 IST

खोदा पहाड, निकला चुहा : अखेर गूढ उकलले, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नितीन बोरसे ल्ल सटाणास्थळ - सटाणा शहरातील भाक्षी रोडवरील एक निर्जन स्थळ.वेळ - सायंकाळी ७ वाजेची.उपस्थिती - दहशतवादविरोधी पथक.रविवारी लष्कराचा शिक्का असलेली व संशयास्पदरीत्या सापडलेली पेटी भाक्षी रोडवरील निर्जन स्थळी एक छोटासा स्फोट करून उडविण्यात येते. त्यात नेमके काय असेल याबाबत दहशतवादविरोधी पथकासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्याही मनात उत्सुकतेने घर केलेले असते. पण जेव्हा त्या पेटीतून शस्त्रास्त्रे अथवा कोणताही ज्वालाग्राही पदार्थ न निघता जेव्हा तिच्यात घंटा आढळून आली, तेव्हा सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर मात्र परिसरात ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशाच प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. गेल्या शनिवारी सायंकाळी बागलाण तालुक्यातील किकवारी येथील नंदू काकुळते यांच्या शेतात भारतीय लष्कराचा शिक्का असलेली संशयास्पद पेटी विक्र ीसाठी आणली असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने रात्री छापा टाकून ही पेटी हस्तगत केली. दरम्यान, देवळाली कॅम्पच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी या पेटीची तपासणी करून ती लष्करीची नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, श्वानपथक तसेच दहशतवादविरोधी पथक सटाण्यात दाखल झाले. त्यांनी वीस ते बावीस किलो वजन असलेल्या पेटीबाबत संशय व्यक्त केल्याने त्याबाबत संशयाचे गूढ वाढत असताना, सोमवारी सायंकाळी सात वाजता दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी ही पेटी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भाक्षी रोडवरील एका निर्जन स्थळी पेटी नेण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने छोटासा स्फोट करून पेटी उडविण्यात आली. या पेटीत एक घंटा व थर्माकॉल निघाले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तणावाखाली असलेल्या यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला. यावेळी सहायक पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, हे यंत्र विक्रीचे कनेक्शन उजैनशी संबंधित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात बडे मासे गळाला लागून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठीचे यंत्र असल्याची चर्चाया प्रकरणी पोलिसांनी सटाणा, खमताणे, डांगसौंदाणे, मुंजवाड, किकवारी खुर्द येथील सहा जणांना ताब्यात घेतले. मात्र तीन जण फरार झाले. ताब्यात घेतलेल्या सहा जणांनी ही पेटी काही दिवसांपूर्वी डांगसौंदाणे येथील एका हॉटेलमध्ये ठेवली होती. त्याची चर्चा झाल्याने ती आठ दिवसांपूर्वी किकवारी येथील नंदू काकुळते यांच्या शेतात लपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ही पेटी सांभाळण्यासाठी संबंधितांना प्रत्येकी तीस ते चाळीस हजार रु पये महिना दिला जात असल्याचीही चर्चा आहे. श्वानपथक व बॉम्बशोधक पथकाने केलेल्या तपासणीत त्या पेटीबाबत संशय व्यक्त केल्याने पोलीस यंत्रणेत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हे पैशांचा पाऊस व धन काढण्यसाठीचे यंत्र विक्र ी केले जात असल्याचा निर्ष्कश काढला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.