शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र पोर्टलवरून ‘कला’ विषय हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:24 IST

कलाशिक्षकांनाही वगळले; कलेचा वारसा संकटात; शाळांमधूनकलावंत घडणार कसे?

- संदीप भालेराव नाशिक : राज्य शासनाने शिक्षकांची शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता तसेच विषय निश्चित करणारा आदेश काढताना या आदेशातून शाळांमधून शिकविला जाणारा कलाविषय आणि कला शिक्षकांनाही वगळण्यात आल्याने शाळास्तरावर कलासंस्कृतीचे बीजे रुजणार कशी? असा प्रश्न शासनाला विचारला जात आहे.७ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आदेश काढून पवित्र पोर्टलवरून शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसेच विषय निश्चित करणाऱ्या या आदेशातून मात्र कलाशिक्षक व कला विषय यांना हद्दपार करण्याचा अजबच निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील कलाशिक्षकांच्या नोकऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.गेली अनेक वर्षे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गामधून कला हा विषय शिकविण्यात येतो. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय असतानाही शैक्षणिक अर्हतेतून हा विषय वगळण्यात आल्यामुळे कलाशिक्षकांच्या कलेचा आणि विद्यार्थ्यांना कला शिकण्याचा मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.चित्रकला, हस्तकला आणि कार्यानुभवातून विद्यार्थी कलेच्या सानिध्यात जाऊन कलेप्रती त्याची ओढ निर्माण होती. त्यामुळेच आजवर हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट होता. मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा कला विषय वगळल्याने कलाशिक्षकांवर अन्याय तर होणार आहेच, शिवाय विद्यार्थ्यांना कला विषयापासून वंचित राहावे लागणार आहे. एकीकडे शाळास्तरावर एलिमेंटरी, इंटरमिजिएटसारख्या कलेच्या परीक्षा घेतल्या जातात. दुसरीकडे कलावंतांची प्रक्रियाच बंद करण्याचे घाटत आहे. जे. जे. आर्टसारख्या नामवंत संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी शालेय जीवनातील कलेची पायरी महत्त्वाची ठरते.प्रसंगी न्यायालयात लढा देऊसमृद्ध कलेचा वारसा देशाला लाभलेला आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून तर संवादाचे माध्यम म्हणूनही कलेला महत्त्व होते, परंतु आता कला विषयालाच बाद करण्याचे घाटत असेल, तर हा फार मोठा आत्मघात ठरेल. सनदशीर मार्गाने शासनापर्यंत भूमिका मांडली जाणार आहे. एवढे करूनही न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यावाचून पर्याय राहणार नाही. कला जगविणे आणि रुजविण्यासाठी न्यायालयात लढावेच लागेल.- दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्यक्ष, विभागीय कला शिक्षक संघ

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण