शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

By admin | Updated: June 25, 2014 00:16 IST

अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

 येवला : अर्ज द्या अन् दाखला घ्या ! या अभिनव उपक्रमाअंतर्गत, येवला तहसील कार्यालयाने सोमवारी तब्बल १५४0 दाखले तालुक्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाचे एक सकारात्मक पाऊल म्हणून आज आता अन ताबडतोब हेच शब्द, तहसील आवारात दिवसभर ऐकू येत होते.येवला व नांदगाव तालुक्यात नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी प्रातांधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक यांनी केली होती. २३ जून व २४ जून या दोन दिवसात येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक सोयीसाठी कागदपत्रे पदरात पाडून घेण्याची पर्वणीच ठरली.सोमवारी सकाळी ११.३0 वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत दाखला वितरण कार्यक्रम चालू होता. विद्यार्थ्यांना संबंधित मागणीनुसारच दाखला व सोबत एक गुलाबाचे फूल देवून या कार्यक्रमाला सत्काराचेच रूप दिले. सेतू कार्यालयाचे सुनील सोनटक्के, बाबासाहेब डांगे यांचेसह १२ कर्मचाऱ्यांनी या कामे अथक परिश्रम घेतले. २३ जून रोजीचे उरलेले दाखले व २४ जून रोजीचा दैनंदिन दाखला देवघेव उपक्रमही यशस्वी करण्यासाठी सेतू कार्यालय रात्री ११ वाजेपर्यंत चालण्याचा अंदाज आहे.प्रशंसा कुशल प्रशासनाचीतहसील कार्यालयात यापूर्वी खेटा मारून विद्यार्थी व नागरिक थकून जात असत तरीही दाखला मिळण्यासाठी अडचणी येत असत. मात्र तहसीलदार व प्रातांधिकारी यांनी दोन दिवस केवळ विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली व अधिकाऱ्यांना नफ्याच्या रुपात प्रशंसा देखील ऐकायला मिळाली.