शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा चौफुलीवरील खड्ड्यांना केला तात्पुरता मुलामा

By admin | Updated: July 20, 2016 23:58 IST

साई समर्थ ग्रुपतर्फे निवेदन : कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी

 कळवण : अभोणा चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला पडलेले मोठमोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत होते. रस्ते खोदाईमुळे पडलेल्या चाऱ्या व खड्डे यात पावसाचे पाणी साचून अभोण्यातील रस्त्यांना गटारीचे स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अभोणा चौफुलीवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविले; मात्र या तात्पुरत्या डागडुजीची अभोण्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली असून, येथील साई समर्थ ग्रुपने कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.गेल्या दोन-तीन महिन्यापासून येथील चौफुलीवर मोठेमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे गरजेचे होते. पण ते नियमितपणे केले जात नसल्याने दरवर्षी खड्ड्यांची मालिका वाढत चालली असून, जुन्या खड्ड्यांची लांबी व खोलीही वाढत आहे.यंदाही पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची विशेष दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात रस्तादुरुस्तीचे पितळ उघडे पडले. दरम्यान, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कळवण सार्वजनिक विभागाने धसका घेत, सोमवारी १८ जुलै रोजी अभोणा चौफुलीवरील खड्डे खडी व मुरमाने तात्पुरते बुजवले.मंगळवारी सकाळी चौफुलीवरील खड्ड्यांचे काम त्वरित होत नसल्याने अभोणा येथील साई समर्थ ग्रुपने रास्ता रोको व खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे निवेदन दिले होते.मात्र खड्डे बुजण्याचे काम आज सुरू झाल्याने त्यांनी रास्ता रोको थांबविला.यावेळी साई समर्थ ग्रुपने उपअभियंता चव्हाण तसेच अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना निवेदन दिले. यावेळी चेतन दिवाण, रोषण वाघ, अनिकेत सोनवणे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, मयूर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, दिलीप सोनवणे, राजेंद्र बागुल, विशाल हिरे, कुणाल जाधव, संकेत बिरार,अमित शहा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)