शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
3
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
4
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
5
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
6
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
7
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
8
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
9
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
10
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
11
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
12
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
13
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
14
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
15
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
16
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
17
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
18
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
19
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
20
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला बुथ कमिट्या सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येत्या काही दिवसांत पार्टीच्या महिला बूथ कमिट्या रचनेच्या कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात व शहरात टप्प्याटप्प्याने बैठका घेण्यात येतील. बूथ कमिट्यांसाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागून त्या अधिकाधिक सक्षम कराव्यात अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी केल्या.
नंदुरबार तेथे साई भगवती लॉन्स व शासकीय विश्रामगृहावर जिल्हास्तरीय महिला आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती एम.एस गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, शहादा पंचायत समितीच्या सदस्य ललिता बाविस्कर, मोहन शेवाळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, सुरेखा गावीत, पुष्पा गावीत, गितांजली गावीत, अलका जोंधळे, अ‍ॅड.अश्विनी जोशी, सब्बीबाई वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला निरीक्षक मीनाक्षी चव्हाण म्हणाल्या, गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांना न्याय मिळवून देत आहे.
पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार राजकारणात आले तेव्हा त्यांनी प्रथम जागतिक महिला धोरण कार्यक्रम राबविला. महिला धोरण राबवित असताना त्यांनी महिलांच्या समस्या, अडीअडचणी, घरगुती हिंसाचार, अत्याचाराचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी सांगितले
शरद पवारांनी महिलांना शिक्षण घेता यावे त्यांना अर्थकारण करायला व चूल आणि मूलच न सांभाळता त्यांनी राजकारणात यायला हवं यासाठी विशेष धोरण ठरविले. त्यामुळे आज पुरुषां पेक्षा महिला राजकारणात सक्रिय आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मी राष्ट्रवादीची हिरकणी' उपक्रम राबविण्यात आला होता. अनेक हिरकण्या आज सक्षम होऊन मोठं बळ मिळालेलं असल्याचे निरीक्षक मीनाक्षी चव्हाण यांनी सांगितले.
लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात महिलांची उपस्थित मोठी होती. अभिजीत मोरे यांनी प्रास्ताविक केले. दुसऱ्या मेळाव्यात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
४राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट आहेत. दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे घेण्यात आले. यापूर्वी देखील राष्टÑवादीचे निरिक्षक आले असता त्यांनाही दोन वेगवेगळे मेळावे घ्यावे लागले होते.
४साई भगवती लॉन्समध्ये झालेल्या मेळाव्यात मात्र महिला कार्यकर्त्यांनी विद्यमान एका महिला पदाधिकाºया विरोधात तक्रारींचा पाढा वाचला. संघटन नसल्याने महिला कार्यकर्त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.