शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

विसरवाडी ग्रामपंचायत आवारात बुधवारी लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सैंदल, तहसीलदार मंदार ...

विसरवाडी ग्रामपंचायत आवारात बुधवारी लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सैंदल, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी. के. माळी, तालुका आरोग्य अधिकारी अविनाश मावची, गटविकास अधिकारी रमेश चौरे,सहाय्यक गटविकास अधिकारी बी.डी गोसावी, तसेच सरपंच बकाराम गावित आदी उपस्थित होते.

येथे लसीकरण मोहीम राबवण्यासाठी पंधरा दिवस आधीपासूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसरवाडी माध्यमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर हे गावात प्रत्येक घरी भेट देऊन ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस घेण्याबाबत माहिती देत होते. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी लस कशी प्रभावी आहे याबाबत मार्गदर्शन करीत होते.

विसरवाडी ग्रामपंचायत आवारात मोठा मंडप टाकून कोरोना महामारी बाबत असलेले आदर्श नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखत नागरिकांची लसीकरणाबाबत नोंदणी करण्यात आली तसेच शिबिरात एकूण १४१ नागरिकांना लस देण्यात आली.

लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तलाठी नरेंद्र महाले, केंद्रप्रमुख अनिल वानखेडे, मुख्याध्यापक सुधाकर सोनार, कमलेश पाटील, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गताडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार पाडवी, डॉ. प्रकाश सोंनजे, रवींद्र अग्रवाल वसंत वळवी, ग्रामसुरक्षा दलाची अध्यक्ष मनोज गावित, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका व विसरवाडी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

लसीकरण मोहीम राबवत असताना नागरिकांची नोंदणी करीत असताना नेटची समस्या जाणवत होती. याबाबत गर्दी होऊ नये म्हणून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी असे सरपंच बकाराम गावित यांनी यावेळी सांगितले.

फोटो : विसरवाडी ता नवापूर येथे लसीकरण मोहीम मे प्रसंगी उपस्थित मान्यवर.