शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

शिवण नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना काढले सुखरूप बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाची चिन्हे नसतांना अचानक आलेल्या मुसळधाव पावसाने शहरवासीयांची एकच दाणादाण उडविली. शिवण आणि पाताळगंगा ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाची चिन्हे नसतांना अचानक आलेल्या मुसळधाव पावसाने शहरवासीयांची एकच दाणादाण उडविली. शिवण आणि पाताळगंगा नदींना पूर आला. दरम्यान, शिवण नदीच्यात पुरात अडकलेल्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. या पावामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, काही भागात पाणी साचले. साधारणत: एक तास ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या चमचमाटात हा पाऊस सुरू होता.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. भाद्रपद हिट देखील जाणवत आहे. त्यामुळे तापमान ३५ ते ३६ अंशापर्यंत जात आहे. उकाडाही असह्य होत आहे. बुधवारी देखील सकाळपासूनच ऊन पडले होते. आकाश निरभ्र होते. पावसाचे कुठलेही चिन्ह नसतांना दुपारी साडेबारा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. नंदुरबार शहरासह परिसरात झालेल्या पावसाने शिवण व पाताळगंगा नदीला पूर आला.
दोन जण पुरात अडकले
शिवण नदीला देखील अचानक पूर आला. दुपारी खामगाव शिवारातील जुन्या पुलाच्या ठिकाणी दोन युवक आपला टेम्पो घेऊन त्या ठिकाणी धुण्यासाठी गेले होते. नदीला पाणी कमी असल्याने त्यांनी मध्यभागी टेम्पो नेऊन धूत असतांना दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक नदीला पूर आला. या पुरामुळे दोन्ही युवक घाबरले. जुन्या पुलाच्या पडक्या पिलरवर चढून त्यांनी आपला जीव वाचवला. सुदैवाने टेम्पो पिलरच्या अडोशाला लावलेला होता. त्यामुळे तो वाचला. परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे टेम्पोचे नुकसान झाले.
प्रशासन धावले
नदीच्या पुरात दोनजण अडकल्याची माहिती प्रशासनाला कळाली. तातडीने शहर पोलीस ठाणे, नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि महसूलचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. दोन्ही युवकांना सुखरूपपणे बाहेर काढले. पाणी ओसरल्यावर टेम्पो देखील बाहेर काढण्यात आला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे या युवकांच्या जीवदानावरून दिसून आले.
पाताळगंगा नदीलाही पूर
या पावसामुळे पाताळगंगा नदीला देखील पूर आला आहे. यामुळे नंदुरबारातील ब्रिटीशकालीन बंधारा देखील ओव्हरफ्लो झाला होता. या बंधाऱ्यावरून सायंकाळपर्यंत पाणी वाहत होते.
गल्लीला आले नदीचे स्वरूप
शहरातील गवळीवाडा, भोई गल्ली ते मंगळबाजार या दरम्यानच्या रस्त्याला आणि गल्लीला नदीचे स्वरूप आले होते. गुढघ्याभर पाणी या भागातून वाहत होते. त्यामुळे यार्दीच्या राम मंदीराजवळील रस्त्यावर अनेकजण घसरून पडत होते. दुचाकीस्वारांचे मोठे हाल होत होते. वाहने बंद पडण्याचे प्रकार देखील या भागात होत होते.