शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

98 गावांनी यंदाही जपलीय एक गाव एक गणपतीची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा 98 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत सामाजिक सलोख्याला बळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा 98 गावांनी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवत सामाजिक सलोख्याला बळ दिले आह़े गावांची संख्या कमी असली तरी जिल्ह्यात दरवर्षी बहुतांश गावे ही परंपरा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत़           2 सप्टेंबरपासून गणपती बाप्पाचे आगमन झाले आह़े यामुळे उत्सवी वातावरण असून जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आह़े यंदा पोलीस दलाकडून गणेशोत्सवापूर्वी घेण्यात आलेल्या शांतता कमिटय़ांच्या बैठकीत सर्व 12 पोलीस ठाणे हद्दीत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यावर भर देण्याचे सुचवण्यात आले होत़े परंतू यात मोजक्याच 98 गावांनी सहभाग नोंदवला असून त्याठिकाणी सध्या धडाक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आह़े जिल्ह्यात यंदा 115 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचे नियोजन होत़े परंतू तांत्रिक अडचणींमुळे काही गावांनी उपक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही़ या गावांकडून पुढच्या वर्षी बाप्पाचा उत्सव धडाडीने साजरा करणार असल्याचे पोलीस विभागाला कळवले होत़े यंदा सर्वाधिक एक गाव एक गणपती हे नवापुर तालुक्यात असून त्याखालोखाल शहादा आणि तळोदा तालुक्यात उत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीनिहाय 6, तालुका पोलीस ठाणे 2, नवापुर 19, विसरवाडी 23, शहादा 3, सारंगखेडा 4, म्हसावद 14, धडगाव 5, अक्कलकुवा 8, तळोदा 12 आणि मोलगी पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली आह़े या गावांमध्ये ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष, युवक यांच्यासह नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणारे मूळ रहिवासी यांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यात येत आहेत़ जिल्हाभरात यंदा 680 सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली आह़े यात एक गाव एक गणपतीचाही समावेश आह़े पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने स्थापना करण्यात आलेल्या एक गाव उपक्रमातील बाप्पाची टप्प्याटप्प्याने विसजर्न करण्यात येणार आह़े  गेल्यावर्षी 680 गणेश मंडळांनी गेल्यावर्षाच्या तुलनेत गणेश मंडळांची संख्या वाढली असल्याने पोलीस प्रशासनाचेही काम वाढल्याचे सांगण्यात आले आह़े यात ग्रामीण भागात टिकून असलेल्या या एक गाव एक गणपती या उपक्रमामुळे ताण काहीसा कमी झाला आह़े 

शहादा तालुक्यातील कवठळ या छोटय़ाश गावात गत सात वर्षापासून पटेल गणेश मंडळाकडून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीपणे राबवली जात आह़े गावातील ज्येष्ठांच्या सहकार्याने युवकांनी हा उपक्रम सातत्याने राबवला आह़े मंडळाकडून वृक्षलागवड, रक्तदान शिबिर, बेटी बचाव बेटी पढाव आणि जलसंधारणांच्या कामांचे नियोजन करण्यात येत़े ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या सहभागाचा चांगल्या पद्धतीने विनिमय व्हावा म्हणून उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला जातो़ कमीत कमी खर्च करुन लोकोपयोगी कामासाठी निधी वापरण्यात येतो़ यांतर्गत गत सात वर्षात गावातील गोरगरीब विद्याथ्र्याना शालेय साहित्य वाटप करण्यावर भर देण्यात आला आह़े उत्सवानंतर रकमेचा हिशोब देऊन त्यावर चर्चाही केली जात़े