शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने केला चोरटय़ाशी यशस्वी प्रतिकार; महिला जखमी, चोरटा पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  स्त्री ही अबला नसुन सबला आहे.  जर दुर्गा, भवानी बनली तर ती दुर्जनांना नष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  स्त्री ही अबला नसुन सबला आहे.  जर दुर्गा, भवानी बनली तर ती दुर्जनांना नष्ट करण्याची ताकद ठेवते हे ती सिध्द करते. याचा प्रत्यय काल बुधवारी रात्री नवापूरच्या एका घटनेतुन आला आहे.नवापूर शहरातील मंगलदास पार्ककडील शेवटच्या टोकावर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर दिपश्री गजानन उपासणी यांचे घर आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराच्या ओट्यावर मोबाईल संभाषण करीत असलेल्या शिक्षिकेवर  भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या चोरटय़ाने हल्ला करुन मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रय} केला. तोंडावर रुमाल बांधलेल्या अज्ञात इसमाच्या या कृतीमुळे घाबरुन गेलेल्या शिक्षिकीने स्वत:ला सावरून घेत चोरटय़ाला प्रतिकार करत त्याचा सामना केला. धाडसाने त्यांनी त्या चोरटय़ाशी झटापटी करुन चांगलीच फाईट दिली. घरात असलेल्या पती व मुलास बाहेर काय चालले आहे याची भनक लागली नाही. चोराशी झटापटी करत त्या खाली पडल्याने जोराचा आवाज आला व त्या ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकताच पती व मुलगा बाहेर धावुन आले. अंधाराचा    फायदा घेत चोरटा पळून गेला. या झटापटीत दिपश्री उपासनी यांचा डावा डोळा, हात व पायला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरातील लोक धावुन आले. दुचाकी घेऊन चोरटा ज्या दिशेत गेला तिकडे लोकांनी शोध घेतला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. चोरटयाने पांढ:या रंगाचा सदरा घातला होता व तोंडावर रुमाल बांधला होता. जवळच असलेले रेल्वे रुळ ओलांडून तो दिसेनासा झाला.  शिक्षक दिनाच्या पुर्व संध्येला शिक्षिकेने केलेली कामगिरी स्त्रीयांना हिम्मत, प्रेरणा व धाडस देणारी ठरली आहे. दिपश्री गजानन उपासनी या नवापूर येथील डि. जे. अग्रवाल शाळेत शिक्षिका आहेत. पती गजानन यांचे नवापूर येथे चष्माचे  दुकान   आहे.

नवापूर शहरातील मंगलदास पार्क भागातील हा परिसर रेल्वे रुळाकडे येत असुन शेवटच्या टोकावर आहे.जनता पार्क, मंगलदास पार्क व शेफाली पार्क  हा नोकरदार व उच्चभ्रु लोकांच्या वास्तव्याचा भाग आहे. शेवटचा भाग असल्याने तेथील रस्ते नेहमी सायंकाळी लवकरच सामसूम होतात. येथून जवळच रेल्वे रुळ व लागुन पुढे लालबारीचा पाडा आहे. इंग्लिश मिडीयम शाळेच्या जवळ रस्त्यावरही नेहमी सन्नाटा असतो. पथदिवे नेहमी बंद राहुन अंधार असतो.