शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना महामारीत ‘देवतारीच’ ठरत असल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

ऐन कोरोना महामारीत साक्षात ‘देवतारीच’ ठरत असल्याने त्यांच्या संवेदनशील मनाचे बोरद परिसरात कौतुक केले जात आहे. ...

ऐन कोरोना महामारीत साक्षात ‘देवतारीच’ ठरत असल्याने त्यांच्या संवेदनशील मनाचे बोरद परिसरात कौतुक केले जात आहे. मूळ बोरद येथील रहिवासी असलेले डाॅ. प्रकाश सुळके हे तरुण डाॅक्टर सन २०१२ पासून धुळे जिल्हा रुग्णालयात सेवेत आहेत. तेथेच त्यांनी एम.बी.बी.एस. २०१० मध्ये पूर्ण केल्यानंतर सेवा सुरू केली आहे. ते सर्जन असून, वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी ते एक महिन्याची रजा घेऊन घरी आले आहेत. तथापि, सध्या कोरोना महामारीचा प्रचंड उद्रेक वाढला आहे. त्यामुळे दिवसागणिक रुग्णांची संख्या शेकडोने वाढत आहे. शहरापुरता मर्यादित असलेल्या या कोरोनाने आता ग्रामीण भागातही दस्तक दिली आहे.

रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे शासकीय व खासगी दवाखाने फुल झाले आहेत. बेड शिल्लक नसल्याने गरीब आदिवासी रुग्ण महागड्या खर्चामुळे बाहेर उपचार घेऊ शकत नसल्याची सत्य परिस्थिती आहे. साहजिकच आपल्या बोरद परिसरातील आदिवासी रुग्णांना पुरेसी वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून या संवेदनशील डाॅक्टर गेल्या १२ दिवसांपासून थेट रुग्णाच्या घरी जाऊन मोफत उपचार करीत आहेत. आतापर्यंत ४० ते ५० रुग्णांवर उपचार करून त्यांना बरेदेखील केले आहे. यात काही संशयित रुग्णदेखील होते. त्यांनाही बरे केले आहे.

रुग्णांच्या प्रकृतीसाठी ते अथक परिश्रम घेत आहेत. रात्री-बेरात्री रुग्णांच्या नातेवाइकांचा फोन आला, तर ते लगेच सेवा देण्यासाठी जात असतात. रुग्णांच्या सेवेसाठी ते एकटेच सर्व कामे करतात. त्यांच्या अशा अथक परिश्रम व मोफत वैद्यकीय सेवेचे बोरद परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे. रुग्णांनी तर ऐन कोरोना महामारीच्या काळात आमच्यासाठी साक्षात ‘देवतारीच’ ठरत असल्याची भावना काही रुग्णांनी व्यक्त केली आहे. वास्तविक अशा परिस्थितीत बाहेरील डाॅक्टर रुग्णांच्या नातेवाइकांची मानसिकता ओळखून अक्षरशः आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप आहे. मात्र, डाॅ. प्रकाश यांनी आपण गावाचं काही देणे लागतो ही उद्दात्त भावना मनी ठेवून गरीब रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देत आहेत. कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्णांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. साधा ताप, सर्दीमुळेही रुग्ण घाबरतात. अशावेळी ते त्यांच्यातील भीती दूर करतात. शिवाय कोरोनाबाबत जागृती करतात. साहजिकच कोरोनाची भीती दूर होत असल्याचे रुग्ण सांगतात.

मेडिकलमधूनही माफक दरात औषधी

डॉ. सुळके यांनी कोरोना महामारीतून सावरण्यासाठी, शिवाय रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बोरद गावातील चारही मेडिकल मालकांना माफक दरात औषधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीस प्रतिसाद देत ते कुठलेही आढेवेढे न घेता रुग्णांना अत्यंत माफक दरात औषधी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे औषध विक्रेत्यांचेदेखील कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे डाॅ. सुळके हे आपल्या पैशांतून रुग्णांस उपचाराबरोबर मोफत औषधी देत आहेत.

कुटुंबात माझ्याबरोबर आईचीही तब्येत बिघडली होती. साधा ताप व सर्दी होती. साहजिकच घाबरलो होतो. मात्र, डाॅ. सुळके यांनी तातडीने पुरेसा उपचार केल्यानंतर त्यातून बरा झालो आहे. रुग्णासाठी ते खरोखर अथक परिश्रम घेत आहेत. आमच्या गावासाठी खरोखर ते ‘देवतारीच’ ठरत आहेत.

-राकेश पवार, बोरद

वडिलांची प्रकृती बिघडल्याने एक महिन्याचा सुटीवर गावात आलो आहे. कोरोना महामारीची चिंताजनक परिस्थिती आहे. बाहेर रुग्णालयात बेड मिळत नाहीत. येथील गरीब आदिवासी रुग्ण आर्थिक परिस्थितीमुळे महागडा उपचार घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना चांगला, पुरेसा उपचार मिळावा म्हणून मोफत उपचार देत आहेत. रुग्ण बरेही होत आहेत. सुटी संपेपर्यंत रुग्णांवर उपचार सुरूच ठेवणार आहे. समाजातील दीन, दुबळ्यांना उपचारांच्या माध्यमातून सेवा देत असल्याने समाधान आहे.

-डाॅ. प्रकाश सुळके, बोरद, ता. तळोदा