शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वडफळ्या येथे नऊ शेळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : जंगलात चरायला गेलेल्या शेळ्यांनी विषारी वनस्पती खाल्ल्याने नऊ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडफळ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : जंगलात चरायला गेलेल्या शेळ्यांनी विषारी वनस्पती खाल्ल्याने नऊ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वडफळ्या येथे घडली. १५ शेळ्यांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्या, त्या बचावल्या आहेत. यात शेळी मालकांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना संबंधित विभागाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेळीपालन करणारे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तालुक्यातील वळफळ्या येथे पडिक क्षेत्रात शेळ्यांना चरण्यासाठी सोडले होते. काही कालवधीनंतर त्या शेळ्यांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. अवघ्या काही वेळातच काही शेळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे शेळी मालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शेळ्यांवर औषधोपचार करून लसीकरण करण्यात आले. तरीही त्यात काही शेळ्या मरण पावल्या तर काही शेळ्यांचा लसीकरणामुळे जीव वाचला. आतापर्यंत एकूण नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पाच शेतकऱ्यांच्या १५ शेळ्यांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या काही शेळ्या दगावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. पिंटू अमरसिंग वळवी यांच्या दोन शेळ्या, नुऱ्या सेल्या वळवी यांच्या तीन, शेळ्या, खुमानसिंग सेल्या वळवी यांची एक शेळी, तेरसिंग गण्या वळवी यांच्या दोन तर मुकेश अमरसिंग वळवी यांच्या एका शेळीचा मृत्यू झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे ७० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती महसूल, वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रोषमाळ बुद्रूकचे मंडळ अधिकारी आर.एस. पाडवी, तलाठी डी.एच. गांगुर्डे, कोतवाल अनिता मक्राणे यांनी पशुमालक व ग्रामस्थांसमोर मृत्यू झालेल्या शेळ्यांचा पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मृत झालेल्या शेळ्यांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नंदुरबारचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रताप पावरा यांनी मृत शेळ्यांचे विच्छेदन केले. त्यांच्या अहवालानुसार विषारी वनस्पतीची पाने खाल्ल्याने या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या वेळी तळोद्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवले, धडगावचे पशुधन पर्यवेक्षक डॉ.राजपाल पावरा, डॉ.होंडे, डॉ.नरेंद्र चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते. संबंधित विभागाकडून मृत झालेल्या शेळी मालकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

मोकाट कुत्रे व जंगल प्राण्यांचा शेळ्यांवर हल्लाधडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोकाट कुत्रे व जंगली प्राण्यांचा मुक्त वावर वाढला असून तालुक्यातील खडकला बुद्रूक व खडकला खुर्द गावातील १५ ते २० शेळ्यांचा फडशा पाडला आहे. मोकाट कुत्रे व कोल्ह्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून अशा घटना तालुक्यातील ग्रामीण भागात रोज घडत आहेत. या घटनांमुळे शेळीपालन करणारे धास्तावले असून मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

काही दिवसांपूर्वीच माझी एक शेळी चरायला गेली असता चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करून ठार केले. असाच प्रकार आमच्या शेजारील शेतकऱ्याच्या तीन ते चार शेळ्यांचे नुकसान मोकाट कुत्रे व जंगली प्राण्यांनी केले आहे. या भीतीतूनच मी माझ्या शेळ्या विकल्या मात्र. गावात शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मनात मात्र धडकी कायम आहे.-वाहऱ्या उग्रावण्या पावरा, शेतकरी, खडकला बुद्रूक, ता.धडगाव