शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला पडतोय विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट बसू लागला आहे. जिल्ह्यातील एकुण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट बसू लागला आहे. जिल्ह्यातील एकुण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण फक्त नंदुरबार शहरातील आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत विशिष्ट भागातच आढळणारे रुग्ण आता शहराच्या चारही भागात आढळले आहेत. कोरोनाचा होणारा फैलाव आगामी काळासाठी मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे. दरम्यान, नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाच्या जेवनावळीतील कथीत खानसामाच्या कुटूंबातील आणखी पाच जण कोरोनाबाधीत आढळल्याने या जेवनावळीत सहभागी लोकांमध्ये आणखी चिंता वाढली आहे.जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात २१ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे दोनच कुटूंबातील तब्बल १२ जणांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे शहराच्या चारही भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागला आहे.खानसामाचे कुटूंब...नंदुरबारातील नगरसेवकाच्या मुुलाच्या लग्नातील जेवनावळीत कथीत खानसामाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटूंबातील इतर पाच जणांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या जेवनावळीत ५० पेक्षा अधीकजण असल्यामुळे आधीच या नगरसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे.नंदुरबारातील नगरसेवकाची जेवनावळीचा मुद्दा गाजतो आहे. या जेवनावळीत ज्याने जेवन बनविले होते तो खानसामा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. आता त्याच्याच कुटूंबातील आणखी पाचजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जेवनावळीत सहभागी लोकांमध्येही चलबिचलता निर्माण झाली आहे. या पाच जणांच्या संपर्कात आणखी किती जण आले होते त्याचीही चाचपणी केली जात आहे.एकाचवेळी १० रुग्ण संख्याएकाचवेळी १० रुग्ण आढळल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. त्यात एकाच कुटूंबातील पाच जणांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत एका वेळी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. आता १० आढळले. त्यामुळे नंदुरबारची रुग्ण संख्या आता ३२ झाली आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत ६० रुग्ण होते त्यात फक्त नंदुरबारचेच ३२ रुग्ण आहेत.चारही बाजुने विळखानंदुरबारात आतापर्यंत मध्यभागातील वस्तीत रुग्ण होते. आता थेट निझर रस्त्यावरील नागाईनगर, लक्ष्मीनगर, धुळेरोडवरील राजीव गांधीनगर व गाझीनगर येथील रुग्णांचा देखील समावेश झाला आहे. याशिवाय सिव्हीलमधील कर्मचारी वेगळेच.मच्छीबाजार भागात राहणाऱ्या ‘त्या’ खानसामाच्या कुटूंबातील तील ३८, २४, ४०, २२, २९ वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालयात कार्यरत ३१ वर्षीय पुरुष तर ४२ वर्षीय महिला, रनाळे येथील पॉझिटिव्ह महिलेच्या कुटूंबातील १ तर नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील ५८ वर्षीय महिला आणि ३१ वर्षीय पुरुष अशा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ एकाच रात्रीत वाढलेल्या १० रुग्णांमुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६० झाली आहे़दरम्यान लक्ष्मीनगर भागातील दोघे पॉझिटिव्ह कल्याण येथील महिला नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होतीे़ आई आणि मुलगा दोघेही दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल होते़ त्यांच्या संपर्कातील नातेवाईक कल्याण येथे पॉझिटिव्ह आली आहे़जामा मशिद भागातील पाच जणांच्या संपर्कातील तसेच रनाळे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे़प्रशासनाकडून मच्छी बाजार, मण्यार मोहल्ला व लक्ष्मीनगर भागात रविवारी सकाळी फवारणी पूर्ण करण्यात आली आहे़

मोलगी येथील एका संशयीताला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रविवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. संशयीत हे पिंपळनेर येथून परत आले होते. गावातच ते खेळणी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे मोलगीचा अनेक भागात बॅरीकेटींग लावून सील करण्यात आले आहे. सायंकाळी उशीरापर्यंत या रुग्णासंदर्भात प्रशासनाने ठोस माहिती दिली नव्हती. रुग्णाच्या स्वॅबचा रिपोर्ट आला किंवा कसा याबाबत गावकऱ्यांमध्ये संदिग्धता कायम होती.

लोणखेडा, ता.शहादा येथे आठवडाभरापूर्वी मुंबई येथून आलेल्या ६७ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह व इतर आजार होता. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी संबधीतांना जिल्हा रुग्णालयात पाठविले. रविवारी सायंकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्यांच्या संपर्कातील दोघांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे.