शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विसजर्न मिरवणुका उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्याचे गणेश विसजर्न रात्री उशीरार्पयत उत्साहात सुरू होते. 34 सार्वजनिक मंडळांनी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात पहिल्या टप्प्याचे गणेश विसजर्न रात्री उशीरार्पयत उत्साहात सुरू होते. 34 सार्वजनिक मंडळांनी व तीन खाजगी मंडळांनी या विसजर्न मिरवणुकीत सहभाग घेतला. यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी रात्री 12 वाजेर्पयत ध्वनी मर्यादा शिथील असल्यामुळे रात्री उशीरार्पयत मिरवुणका सुरू होत्या.   नंदुरबारात दोन टप्प्यात गणपती विसजर्न केले जाते. पहिला टप्पा हा गौरी विसजर्नाच्या दिवसाचा आणि दुसरा व अंतिम टप्पा हा अनंत चतुदर्शीचा असतो. या दोन्ही टप्प्यात अनेक मोठय़ा मंडळांचा समावेश राहत असल्यामुळे मिरवणुकाही मोठय़ा राहतात. परिणामी पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण असतो. मोठी तालीम मंडळे पहिल्या टप्प्यात अनेक मोठय़ा तालीम मंडळांचा समावेश मुख्य विसजर्न मिरवणुकीत होता. सुभाष चौकातून मंगळ बाजार, गणपती मंदीर, सोनार खुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजीरोड मार्गे मिरवणुका पुढे नेण्यात आल्या. काही मंडळांनी परस्पर अर्थात आपल्या परिसरातच मिरवणुका काढून परस्पर विसजर्नाला प्राधान्य दिले. मुख्य मिरवणूक मार्गावर 12 पेक्षा अधीक मंडळांनी मिरवणुका नेल्या. सर्वच मंडळाच्या कार्यकत्र्यामध्ये उत्साह दिसून आला.मुख्य मार्गावर बॅरीकेट्स मुख्य मिरवणूक मार्गाला मिळणा:या इतर लहान रस्तांना बॅरीकेट्स लावण्यात आले होते. पोलिसांनी देखील ठिकठिकाणी बॅरीकेटींग केली होती. पालिकेतर्फे काही ठिकाणी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देत पाण्याची सोय करण्यात आली होती. पालिकेतर्फे सोयपालिकेतर्फे मूर्ती विसजर्नासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती. सोनी विहिरीजवळ त्यासाठी वाहने उभी करण्यात आली होती. अनेक सार्वजनिक मंडळे व खाजगी मंडळे आणि घरगुती मूर्ती देखील या वाहनांवर ठेवण्यात आल्या. 

शहादा येथे शुक्रवारी पहिल्या टप्प्याच्या गणेश विसजर्न मिरवणुकीत किरकोळ वाद झाला. त्याचे पडसाद पोलिसांनी कुठेही उमटू दिले नाहीत. परंतु असे असतानांही शनिवारी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. नंदुरबारात सहा वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यातील विसजर्न मिरवणुकीला गालबोट लागले होते. त्यामुळे अधिकचा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांनी ठिकठिकाणी स्वत: भेटी देत बंदोबस्ताचा आढावा घेतला. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, शिघ्र कृती दलाचे पथक यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैणात करण्यात आले होते. मिरवणुका रेंगाळत राहू नये म्हणून विशेष दक्षता देखील घेण्यात येत होती.