शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

परसबागेमुळे मिळतोय ‘अमृत आहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रामाणिक प्रय}ामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाडय़ांच्या परिसरात परसबाग लावण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रामाणिक प्रय}ामुळे जिल्ह्यातील अनेक अंगणवाडय़ांच्या परिसरात परसबाग लावण्यात आली आहे. बालक तसेच स्तनदा व गर्भवती मातांना सकस आहार देण्यासाठी परसबागेतून ताज्या आणि पौष्टीक भाज्या उपलब्ध होत आहेत.नंदुरबार तालुक्यातील बालआमराई येथील अंगणवाडी सेविका संगीता कोकणी आणि मदतनीस ललीता कोकणी तसेच ढेकवद येथील अंगणवाडी सेविका लता वळवी आणि मदतनीस विमल सौंदाणकर यांनी परसबागेचा उपक्रम गेल्या दोन वषार्पासून राबवत आहेत. त्यांनी परसबागेत दुधी, गिलके, दोडके, भेंडी, शेवगा आदी भाज्या लावल्या आहेत. सुरुवातीला मेथी आणि पालकही लावण्यात आले होते. परंतु मुसळधार पावसामुळे दोन्ही भाज्या खराब झाल्यावरही हार न मानता या महिला कर्मचा:यांनी  नव्याने वेगळ्या भाज्यांची लागवड केली. आता दररोज दोन ते तीन किलो भाज्या या परसबागेतून उपलब्ध होतात.अंगणवाडीत शिजविल्या जाणा:या अमृत आहारासाठी साधारण 750 ग्रॅम भाज्यांची आवश्यकता असते. शिवाय बचत गटामार्फत मुलांना देण्यात येणा:या पौष्टीक आहारातदेखील या भाज्यांचा उपयोग होत असल्याने अन्नाची गुणवत्ता वाढते आहे. अॅनिमियापासून मातांना दूर ठेवण्यासाठी हा आहार उपयुक्त ठरणार आहे. साधारण दिवाळीर्पयत पावसाच्या पाण्यावर भाज्या घेतल्या जातात. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाज्या लावण्यात येतात. या महिला स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने बियाणे सहज उपलब्ध होत आहे. अंगणवाडीत शिजविल्या जाणा:या उसळीत  दुधीचा उपयोग केला जातो. तर वरणात शेवग्याच्या पाल्याचा उपयोग केला जातो. इतरही  हिरव्या भाज्यांचा अन्नात उपयोग होतो. हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करण्याबाबत जागृती करण्यासाठी अंगणवाडीत तयार केलेल्या अक्षयपात्रात परसबागेतील भाज्या ठेवण्यात येतात. नंदुरबार प्रकल्पांतर्गत सुमारे 100 अंगणवाडय़ांमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात इतरत्रही अंगणवाडय़ांच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचा प्रय} होत आहे. या उपक्रमामुळे पोषण अभियानाला गती मिळाली आहे.