शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेक जागीच ठार, सहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दोन ट्रकांमध्ये जीप दाबल्या गेल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दोन ट्रकांमध्ये जीप दाबल्या गेल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाल्याची घटना शेवाळी-नेत्रंग महामार्गावर नयनशेवडी फाट्यानजीक घडली. महामार्गावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.गणेश भामण्या वसावे (५०) व रिना गणेश वसावे (७ वर्ष) रा.मोराबा हे जागीच ठार झाले आहेत. तर चंद्रसिंग अमरसिंग वळवी रा. मोरांबा, सुभाष मोहनसिंग वसावे नयन शेवडी, राधिका निलेश वसावे खालचापाडा, करीनाबाई भामट्या वळवी, रा.मोरंबा या गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित राजू वसावे व मोगरी राजू वसावे रा.जामली हे किरकोळ जखमी असल्याने अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बाळापुरे हे उपचार करत आहेत.अक्कलकुवा ते खापर दरम्यान नयन शेवडी फाट्याजवळ जीप (क्रमांक एमएच ४१ सी- ३७५६) व ट्रक (क्रमांक एमएच २१ एक्स- ७८०१) व (क्रमांक एमएच ४० बी एल १२६२) यांच्यात भीषण अपघात झाला. वडील व मुलीचा जागीच मृत्यू. अन्य सहा जण जखमी झाले असून यापैकी चार गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.तीनही वाहने खापर कडून अक्कलकुवा च्या दिशेने येत असताना पुढे अवजड कंटेनर मध्ये बोलेरो गाडी व त्यामागे ट्रक येत असताना मधली बोलेरो गाडी या दोन्ही अवजड वाहनांच्या मध्ये दाबली गेल्याने हा विचित्र अपघात झाला.सध्या देव मोगरा मातेची यात्रा सुरू असून हे भाविक मातेच्या यात्रेसाठी देव मोगरा येथून परत आपल्या गावी येत असताना अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या नयन शेवडी गावाजवळ हा अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जवळ असलेल्या गुजरात राज्यातील मोरांबा येथील मयताच्या गावातील लोकांनी मोठी गर्दी केलेली होती. मयताच्या नातेवाईकांचा रुग्णालयातील आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. घटनास्थळी अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, डी. डी. पाटील, पोलीस निरीक्षक गायधने यांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. या महामार्गावर अतिशय जीवघेणे खड्डे पडले असल्याने होणाऱ्या अपघातात वाढ झाली असून हा महामार्ग अजुन किती लोकांचे बळी घेईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.