शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ViDhan Sabha 2019: उदेसिंग पाडवी यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा  : बहुप्रतीक्षित सत्ताधारी भाजपची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शहादा मतदारसंघातून विद्यामान आमदार उदेसिंग पाडवी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा  : बहुप्रतीक्षित सत्ताधारी भाजपची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शहादा मतदारसंघातून विद्यामान आमदार उदेसिंग पाडवी यांना पक्षाने उमेदवारी नाकरल्याने  त्याच्या कार्यकत्र्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता आमदार पाडवी काय भूमिका घेतात याकडे सा:यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपच्या यादीत नाव न आल्याचे कळताच ते आमदार एकनाथ खडसे यांच्या भेटीला रवाना झाले.विधानसभेसाठी सत्ताधारी भाजपा-सेना युतीच्या उमेदवार निवडीकडे कार्यकत्र्याबरोबरच विरोधकांचेही लक्ष लागून होते. कारण शहादा मतदारसंघातून आमदार पाडवींबरोबरच त्यांचे पुत्र पोलीस निरीक्षक  राजेश पाडवी, अनुसूचित जमातीचे रूपसिंग पाडवी यांनी उमेदवारीची              मागणी केली होती. याशिवाय पक्ष निरीक्षकांकडे मुलाखतीही दिल्या होत्या.    या उपरोक्त सर्वानीच वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावल्यामुळे उमेदवारीचे सस्पेंस अधिकच वाढले होते. शेवटी भाजपने मंगळवारी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. आमदार पाडवी यांचे नाव जाहीर न झाल्यामुळे त्यांच्या कार्यकत्र्याना अक्षरश: धक्का बसला. कारण आमदार पाडवी यांनी आपल्या कामाच्या जोरावर निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पिंजून काढला होता. साहजिकच वरिष्ठ नेत्यांनी कामाला लागण्याचे सांगितले होते. मात्र एनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकत्र्यामध्ये नाराजीचा सूूर व्यक्त होत आहे. पाडवी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी आमदार पाडवी काय भूमिका घेतात याकडे कार्यकत्र्याचे लक्ष लागून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवस असल्याने काय घडामोडी घडतात याची उत्सुकता लागली आहे.