शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

बोरदला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा पंचायत समिती व तळोदा तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा पंचायत समिती व तळोदा तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडर्न इंग्लिश स्कूल बोरद येथे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात ९२ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी पिपल्स एज्युकेशन संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वासंतीबाई ठाकरे, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, उपसरपंच रंजनकोरबाई राजपूत, संस्इथेचे संचालक व गणेश ग्रुपचे अध्यक्ष संजय माळी, अरविंद मगरे, विश्वनाथ कलाल, बच्चुसिंग परदेशी, मुरलीधर सागर, माजी प्राचार्य डी.व्ही. पाटील, गटशिक्षणाधिकारी एस.एम. धनगर, मंगेश पाटील, सीताराम ठाकरे उपस्थित होते.या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निमेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात ३५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी धनगर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेपासून लांब राहून विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. तसेच विज्ञान शिक्षकांनी विज्ञानाबाबत जनजागृती करुन अंधश्रद्धामुक्त भारत घडविण्याचे आव्हान केले. याप्रसंगी मॉडर्न इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नीलेश सूर्यवंशी यांनी शाश्वत कृषी पद्धत, स्वच्छता व आरोग्य संसाधन व्यवस्थापन उपकरणांबाबत माहिती दिली. प्रदर्शनात कल्याणी वळवी या विद्यार्थिनीने हैद्राबाद येथील घटना व महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गीत सादर केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी व मान्यवरांनी कौतुक केले. आभार मुख्याध्यापक नीलेश सूर्यवंशी यांनी मानले.या प्रदर्शनासाठी तळोदा तालुका मुख्याध्यापक संघ व मॉडर्न इंग्लिश स्कूलचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.