शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

परराज्यातील वाळू वाहतुकीला जिल्हा हद्दीतील रस्त्यांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 11:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळुची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळुची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहे.जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून नंदुरबारमार्गे इतर भागात वाळू वाहतूक सुरू आहे. या भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, शासनाकडून हे जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतुकदारांमुळे करोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाळू वाहतुकदारांकडून चेहऱ्याला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक जागेवर न थुंकणे, पान, तंबाखू, गुटखा सेवन व मद्यप्राशन न करणे आदी निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे.वाहू वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतुकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा ते नंदुरबार मार्गावर वाळू वाहतुकदारांनी रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. याबाबी लक्षात घेता वाळू वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, मुंबई पोलीस अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार वरील आदेश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरिता हा आदेश लागू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा संघटना कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील.