शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सम-विषम पार्किंग आणि एकेरी मार्गांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सम-विषम पार्किंग आणि एकेरी वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून सम-विषम पार्किंग आणि एकेरी वाहतूक मार्गांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत़ या प्रस्तावांवर नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करुन नव्या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे़नगरपालिका चौक, मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी-बाजार, गांधी पुतळा, हाट-दरवाजा, गणपती मंदिर, जळका बाजार, शिवाजी चौक व माणिक चौकात दैनंदिन वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या यामुळे नागरिकांसह या भागातील रहिवासी, व्यापारी हैराण झाले आहेत़ येथील बहुतांश रस्ते हे अरुंद असल्याने ही स्थिती निर्माण होत आहे़ यावर मार्ग काढण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे २० जुलै २०१९ पासून समविषम पार्किंग व एकेरी वाहतूकीच्या निर्णयाचा अंमलबजावणी करण्यात आली होती़ या अंमलबजावणीवर शहरातील काही नागरिकांनी आक्षेप घेतल्या होत्या़ यामुळे पुन्हा नव्याने वाहतूक नियमावली लागू करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे़ यानुसार येत्या ५ जानेवारी २०२० पर्यंत नागरिकांनी शहर वाहतूक शाखेकडे याबाबत सूचना केल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़वाहतूक शाखेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूकीबाबतच्या अडचणी दूर होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे़ वाहतूक शाखेकडून गेल्या काही महिन्यांपासून वाहनांवर सातत्याने कारवाई होत असल्याने सामान्य वाहनधारक हैराण झाले आहे़ नियमांची अमंलबजावणी होणार असल्याने समस्या मार्गी लागणार आहे़हाट दरवाजा, गणपती मंदिर, माणिक चौकाकडून येवून शास्त्री मार्केट कडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन सरळ जात वळसा घेत शास्त्री मार्केटकडे जावे लागणार आहे़ शास्त्री मार्केट चौकाकडून सिराज बिल्डींग मार्गाने सरळ पालिकेडे जावे लागेलमहाराष्ट्र व्यायाम शाळा ते डॉ़ आंबेडकर पुतळा या भागात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायामशाळा मार्गाने जाणारी वाहने सोनार खुंटावरुन साक्रीनाक्याकडे जातील़ तर या मार्गाने चारचाकी वाहनांना प्रवेश बद करण्यात येणार आहे़ यात शासकीय व दुचाकी वाहनांना सुट दिली गेली आहे़ नवापुर चौफुलीकडून येणाºया वाहनांना जळका बाजार, शिवाजी चौक, देसाईपुरा मार्गाने शहरात प्रवेश दिला जाणार आहे़शहरात खालीलप्रमाणे सम-विषम पार्किंग प्रस्तावित आहे़नेहरु पुतळा ते पालिका रस्त्याची डावी आणि उजवी बाजू याठिकाणी समविषम पार्किंग होणार आहे़नगरपालिका चौक ते बँक आॅफ बडोदा एटीएम उजवी बाजू व डावी बाजू या दरम्याऩशास्त्री मार्केट ते चंद्रकला साडी सेंटर दोन्ही बाजूला़माणिक चौक ते जीजाजी शूज व डी़जे़मॅचिंग सेंट ते पटराणी साडीसेंटर या ठिकाणी़गांधी पुतळा ते हाटदरवाजा या चौकादरम्यान नारायण एजन्सी ते पुष्पांजली एजन्सी तसेच सचिन एजन्सी ते पाणपोईपर्यंत याठिकाणी समविषम पार्किंगचा प्रस्ताव देण्यात आला आहे़वाहतूक शाखेने ३१ डिसेंबरसाठी नियमावली लागू केली असून यादिवशी दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती कºणयात आली आहे़ तसेच मद्यप्राशन करुन चारचाकी व दुचाकी चालवणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे़