शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतुकीचा बळी! घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरु असताना पित्याचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:03 IST

अर्धापूरात जड वाहतूकीने घेतला बळी; मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( जि. नांदेड ) :
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना वधूपित्याचा अपघातीमृत्यू  झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी ( दि.२८) मार्च रोजी घडली. मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाघजी सखाराम लिंगायत (४५ वर्षे रा.चोरंबा ता.अर्धापूर) हे अर्धापूर शहरातील व्यंकटराव साखरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करतात. वाघजी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दैनंदिन वस्तू खरेदीसाठी सायकलवर शहरात जात असतांना अर्धापूर शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी महामार्ग, अर्धापूर पोलीस यांनी धाव घेतली व मयतांचे पार्थिव पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

पुढील महिन्यात होते मुलीचे लग्न
वाघजी लिंगायत यांची मुलगी नेहाचा नुकताच साखरपुडा  झालेला आहे. पुढील महिन्यात तिच्या लग्नाची तारीख काढणार होते. दरम्यान, घरात नेहाच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. अशी लगबग सुरू असताना वधुपित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जा
शहरात अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु बंदी झुगारून रोज अनेक वाहने शहरात येतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गुत्तेदारांचा हलगर्जीपणा वाटेल तिथे खोदकाम
रस्त्याचे काम सुरू असून गुत्तेदार वाटेल तिथे खोदकाम करून वाहतुकीस व वाहन चालकांना अडथळा निर्माण करत आहेत. रस्ता उखडून ठेवल्याने धुळ व चुरीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच अनेक गाड्या घसरून पडत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन वाहतुकीस अडथळे येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड