शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप नगरसेवकांत धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:26 IST

भाजप नगरसेवक एक दिवसासाठी निलंबित 

ठळक मुद्देमनपासमोर भाजपची निदर्शने

नांदेड : ‘काँग्रेस नगरसेवक भाजपाच्या वाटेवर’ वृत्तावरून गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक दीपक रावत यांच्यात धक्काबुक्कीचा प्रकार घडला.   या गोंधळामुळे महापौर दीक्षा धबाले यांनी भाजपचे रावत यांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. 

विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी यांनी केंद्र सरकारने कलम ३७० आणि ३५ (अ) रद्द केल्याबद्दल, मुस्लिम महिलांना न्यायासाठी तलाक कायदा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावावरील चर्चेत साबेर चाऊस, फारुख अली खान यांनी सदर कायदा हा मुस्लिम महिलांनी नाकारल्याचे सांगितले. त्याचवेळी सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी काँग्रेस नगरसेवकासंदर्भात आलेल्या वृत्ताबाबत चर्चा सुरू केली.  भाजपचे दीपक रावत यांच्या माहितीवरुन सदर वृत्त पसरले. त्यामुळे काँग्रेसचे कोणते नगरसेवक  भाजपाच्या वाटेवर आहेत याचा खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे अब्दुल फईम यांनी केली. याच विषयावर फईम आणि रावत आमने-सामने आले. फईमच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी रावत यांच्या अंगावर धाव घेतली. त्यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाला. याच गोंधळाच्या वातावरणात महापौर धबाले यांनी रावत यांना एक दिवसासाठी निलंबित केल्याची घोषणा केली. 

भाजपाने सदर निलंबन कलम ३७० च्या रद्द करण्याच्या अभिनंदन ठरावावरुन झाल्याची भूमिका मांडली. काँग्रेसच्या या भूमिकेचा त्यांनी निषेध केला. काँग्रेसकडून मात्र हे निलंबन खोट्या माहितीच्या आधारावरुन प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर झालेल्या गोंधळामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापौर दीक्षा धबाले यांनीही रावत यांचे निलंबन सभागृहातील गैरवर्तनामुळे केल्याचे स्पष्ट केले. 

भाजपकडून घटनेचा निषेध भाजपचे नगरसेवक रावत यांना निलंबित केल्याची माहिती मिळताच भाजपचे शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, प्रविण साले, नगरसेविका बेबीताई गुपिले, शांताबाई गोरे, उपजिल्हाध्यक्ष कैलास सावते, विनय सगर, जयप्रकाश येवले, युवा मोर्चाचे सोनु कल्याणकर, महादेवी मठपती, प्रभु कपाटे, शैलेंद्र ठाकूर, शरद यादव, धनराज मंत्री आदी भाजपा कार्यकर्त्यांनी रावत यांच्या निलंबनाचा निषेध केला.

विरोधी पक्षनेत्या आंदोलनापासून दूररावत यांच्या समर्थनार्थ भाजपाचे शहर पदाधिकारी धावले असले तरी भाजपच्या विरोधी पक्षनेत्या गुरप्रीतकौर सोडी या मात्र या आंदोलनापासून दूर राहिल्या.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका