बाबा लगीन ! लग्न का करुन देत नाहीत म्हणत मुलाचा आई-वडीलावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 18:24 IST2020-02-17T18:07:18+5:302020-02-17T18:24:34+5:30

चिडलेल्या मुलाने स्वंयपाक घरातील भाजी कापण्याच्या चाकूने माता-पित्यावर वार केले़

Daddy Marriage ! Son's attack on parent by demanding marriage at Nanded | बाबा लगीन ! लग्न का करुन देत नाहीत म्हणत मुलाचा आई-वडीलावर हल्ला

बाबा लगीन ! लग्न का करुन देत नाहीत म्हणत मुलाचा आई-वडीलावर हल्ला

नांदेड : शहरातील विवेकनगर भागात माझे लग्न का करुन देत नाही असे म्हणत तरुणाने आई-वडीलावर चाकूने हल्ला केल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या  घडली़ या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत़

विवेकनगर येथे डॉ़संजय लाटकर हे पत्नी आणि मुलगा वल्लभ याच्यासोबत राहतात़ १६ फेबु्रवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वल्लभने माझे लग्न का करुन देत नाही असे म्हणून आईसोबत वाद घातला़ त्याचवेळी डॉ़संजय लाटकर हे घरी आले़ यावेळी दोघांनीही वल्लभची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ परंतु चिडलेल्या वल्लभ याने स्वंयपाक घरातील भाजी कापण्याच्या चाकूने माता-पित्यावर वार केले़ त्यानंतर त्याने घरातून पळ काढला़ लाटकर दाम्पत्याच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी धावत आले़ त्यांनी लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़ या प्रकरणी संजय लाटकर यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात वल्लभ याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

Web Title: Daddy Marriage ! Son's attack on parent by demanding marriage at Nanded