शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मुुदखेड तालुक्यात रॉकेल वाटपात अपहार

By admin | Updated: May 31, 2014 00:29 IST

नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़

नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़ ही माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे़ जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात रॉकेल वाटपात अपहार करून त्याचा काळा बाजार केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे़ याविषयी अधिक माहिती अशी की, शिधापत्रिकाधारकांना करण्यात आलेल्या रॉकेलच्या वाटपाबाबत शासन निर्णयानुसार शिधापत्रिकेवर नोंदी घेणे अनिवार्य असताना तालुक्यातील बहुतांश रॉकेल विक्रेते नोंदी घेत नाहीत़ तसेच शिधापत्रिका न दाखवताच रॉकेलची विक्री करतात़ शिधापत्रिकाधारकांना १ ते ४ लिटर पर्यंत रॉकेल वाटप केल्याच्या पावत्या लाभर्थ्यांना दिल्या जात नाहीत़ यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता मोतिराम काळे यांनी माहिती अधिकाराखाली डिसेंबर २०१३ मध्ये माहिती मागितली होती़ यावरून हा प्रकार पुढे आला आहे़ जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी याप्रकरणाची दखल घेत मुदखेडसह जिल्ह्यातील सर्व तहासीलदारांना त्यांच्या तालुक्यात लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेवर नोंदी घेवूनच रॉकेल वाटप करावे़ पात्र लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका नसेल तर त्यांना शिधापत्रिकेची दुय्यम प्रत द्यावी, रॉकेल वाटपाबाबतची पावती शिधापत्रिकाधारकांना द्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी केल्या आहेत़ जिल्ह्यामध्ये ३६ अर्धघाऊक परवानाधारक व १५०४ किरकोळ, हॉकर्स केरोसीन परवानाधारक यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आलेली आहे़ यामध्ये दोषी आढळून आलेल्या १२३ केरोसीन परवानाधारक यांच्याकडून शासन निर्णयातील तरतुदीनुसार एकूण २ लाख ६७ हजार अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे़ नायगाव तालुक्यात दोषी आढळून आलेल्या १५ केरोसीन परवानाधारकांकडून ४५ हजार रूपये अनामत रक्कम जप्त करण्यात आली़ हदगाव तालुक्यातील दोन अर्धघाऊक केरोसीन परवानाधारकांचा परवाना रद्द करण्यात आला़ नायगाव तालुक्यातील औराळा येथील, नांदेड येथील एकाचा परवाना रद्द करण्यात आला़ त्यांच्याविरूद्ध वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याचेही त्यांनी काळे यांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे़ (प्रतिनिधी)