शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘लाडकी बहिण’ रोखण्यासाठी पटोले, केदार, ठाकरेंशी जवळिक असलेले वडपल्लीवार कोर्टात गेले

By कमलेश वानखेडे | Updated: August 31, 2024 16:34 IST

देवेंद्र फडणवीस यांनी डागली तोफ : देवा भाऊ असे पर्यंत हायकोर्टात स्थगिती येऊ देणार नाही

नागपूर : काही लोक म्हणत आहेत की लाकडी बहीण योजना सुरू ठेवू नका. मी कागद घेऊन आलो. ही यजोना बंद व्हावी म्हणून काँग्रेसचे अनिल  वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. हे तेच आहेत जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. माजी मंत्री सुनील केदार यांचे राईट हॅण्ड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांची नियत ओळखा. पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगतो, देवा भाऊ असे पर्यंत हायकोर्टात मोठा वकील उभा करू, काहिही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असे आश्वस्त केले.   

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले, ही योजना रोखण्यासाठी विरोधक पहिल्यांदा मुंबईच्या न्यायालयात गेले. तेथे जमले नाही. आता नागपूरच्या न्यायालयात गेले. याची नियत समजून घ्या.  नागपुरात दुसऱ्या टप्प्यात ५० लाख खात्यांमध्ये पैसे दिले आहेत. १ कोटी ६० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा केले आहेत. १० टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशी वग्लना महाविकास आघाडीचे नेते करीत होते. त्यांना आव्हान आहे की या महिलांना पैसे मिळाले  की  नाही  ते  विचारा. 

 

लाडक्या बहिणींनो मला सांगा या ठिकाण योजना आणून चूक केली का, ही योजने सुरू ठेवायची आहे ना, मुलींना मोफत शिक्षण सुरू ठेवायची आहे ना, महिलांना एसटीत पन्नास टक्के सवलत दिली, या योजना सुरू ठेवायच्या आहेत ना, मग आम्हाला आशिर्वाद द्या, असे आवाहान त्यांनी केले. ५०७ अभ्यासक्रमांसाठी  मुलींच्या शिक्षणाची  फी  त्यांचे लाडके भाऊ भरणार आहेत. महिला या वस्तू नाहीत. त्या माता, भगिनी आहेत. ही शिकवण मुलांना द्यावी लागेल. ते महिलांच्या विरुद्ध अपराध करतील त्यांना मोकळे सोडले जाणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारnagpurनागपूर