राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश हा 'सरप्राईज' नसला, तरी विदर्भाच्या राजकारणात या प्रवेशाचे दूरगामी राजकीय परिणाम दिसतील, असे मानले जाते. कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आता सामाजिक संघटना म्हणून काम करणार असला तरी शिंदेसेनेचे जिल्ह्याजिल्ह्यांमधील नेते तसेच महायुतीमधील भाजप कडू यांना स्वीकारणार का, हा प्रश्न चर्चेत आला आहे.
मूळचे शिवसैनिक असलेले कडू यांनी प्रहारच्या माध्यमातून स्वतंत्र H ओळख निर्माण केली. आता पुन्हा शिवसेनेकडे परत येताना त्यांनी राजकीय वर्तुळ पूर्ण केले. महायुतीमधील शह-काटशहाच्या राजकारणात कडू यांच्या रूपाने विदर्भ या भाजपच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदे यांना तगडा मोहरा मिळाला हे खरे. तथापि, बच्चू कडू व प्रहारच्या आक्रमक शैलीमुळे महायुतीत तणावाचे क्षण येणार नाहीत ना, अशी शंका आहे. अमरावती जिल्हा बैंक अध्यक्षपद असो की अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असो, बच्चू कडू यांची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. रवी राणा-नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू या संघर्षात भाजपकडून राणा दाम्पत्याला बळ दिले जाते. याच कारणाने कडू यांनी एकनाथ शिंदे यांना जवळ करण्याचा, त्यासाठी प्रहारचे राजकीय शस्त्र म्यान करण्याचा निर्णय घेतला हे स्पष्ट आहे.
भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देताना पूर्व विदर्भातून संजय भेंडे यांची निवड केली. परंतु, पश्चिम विदर्भाला डावलले. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या रूपाने नेमकी ही संधी साधली आणि जणू भाजपसमोर आव्हान उभे केले. अशावेळी महायुतीचा भाग बनल्याने कडू यांची आक्रमकता कमी झाली तर ती भाजपला हवी असेल. परंतु, कड्डू हे त्यांचा मूळ स्वभाव बदलतील अशी शक्यता धूसर आहे. परिणामी, कडू महायुतीत मिसळतात की महायुतीलाच हादरे देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता
- चारवेळा आमदार, एकदा राज्यमंत्री आणि दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर उभी केलेली प्रहारची चळवळ ही कडू यांची ताकद आणि आंदोलनांच्या जोरावर सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणारा 'रस्त्यावरील नेता' म्हणून त्यांची ओळख आहे. पण, हाच मुद्दा त्यांना शिंदेसेनेमध्ये अडचणीचा ठरू शकतो.
- शिंदे यांच्या शिवसेनेचे विदर्भात विधानसभेचे चार तर विधान परिषदे दोन आमदार आहेत. यापैकी संजय राठोड व अॅड. आशिष जयस्वाल यांन लाल दिवा मिळाला आहे. या सर्वच नेत्यांना विदर्भाचा चेहरा बनण्यात मर्यादा आहेत.
- यापैकी कोणीही रस्त्यावरच्या लढाईसाठी ओळखले जात न केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना 'प्रतापगड' अभेद्य ठेवण्यातच अधिक रस आहे. आता कडू यांच्या प्रहार चा आपापल्या जिल्ह्यात त्रास होईल, अशी या नेत्यांना भीती आहे.