शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेसाठी भूसंपादनाचे तीन प्रस्ताव

By admin | Updated: May 21, 2015 02:22 IST

जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पहिल्या दिवसांपासूनच कामाचा झपाटा सुुरू केला आहे.

नागपूर : जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पहिल्या दिवसांपासूनच कामाचा झपाटा सुुरू केला आहे. पुढच्या काळात प्रशासकीय कामकाजात अनेक आमूलाग्र बदल झालेले दिसतील, असे त्यांनी संकेतही दिले आहेत.३८ वर्षीय कुर्वे उत्तराखंड कॅडरचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे नागपूरचे आहेत. नागपूरसाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची आंतरिक इच्छा त्यांच्या पहिल्या दिवसाच्या कामातूनच दिसून आली. व ती त्यांनी बोलूनही दाखविली. आल्या आल्याच त्यांनी नागपूरच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या भूसंपादनाच्या तीन प्रस्तावांचा मार्ग मोकळा केला व ते शासनाकडे पाठविल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मार्फत होणारा धान्य पुरवठा आणि त्यानंतर विविध प्रमाणपत्रांसाठी लागणाऱ्या वेळेवर ही मर्यादा आणल्या. पुढच्या काळात प्रशासकीय कामकाजात अनेक आमूलाग्र बदल झालेले दिसतील असे त्यांनी स्पष्ट केले.मेट्रोच्या कामाला गती कुर्वे यांनी मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाचे तीन प्रस्ताव बुधवारी मंजूर करून शासनाकडे पाठविले. त्यात पटवर्धन हायस्कूलची २२५२.६५ चौ.मीटर, पोलीस व पटर्वधन हायस्कूलच्या ताब्यातील १७८२.७० चौ. मीटर आणि मॉरिस कॉलेजची २२३५.७७ चौ.मीटर जागेचा समावेश आहे. या जागेच्या अधिग्रहणासंदर्भात प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासने फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते हे येथे उल्लेखनीय.धान्यसाठ्याची माहिती एसएमएसद्वारेस्वस्त धान्य दुकानासाठी राज्य शासनाकडून दुकानदारांना देण्यातआलेल्या धान्याची माहिती माहिती एसएमएस कार्डधारकांना एसएमएसद्वारे दिली जाते. मात्र अनेक ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले आहेत. ते पुन्हा नव्याने गोळा करण्याच्या सूचना कुर्वे यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे धान्य काळ्याबाजारात जाण्यास पायबंद बसेल, असा विश्वास कुर्वे यांनी व्यक्त केला.