नागपूर विभागातील पंधरा गावांमध्ये पोटहिस्सा मोजणीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 16:07 IST2026-04-21T16:04:46+5:302026-04-21T16:07:05+5:30

Nagpur : नकाशा व अधिकार अभिलेख संलग्न करण्यासोबतच प्रत्येक भूभागास अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्यासाठी नकाशाची पोटहिस्सा विभागणी हा महत्त्वाचा विषय प्रकल्प भूमी अभिलेख विभागातर्फे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे.

The work of counting the sub-shares has begun in fifteen villages of Nagpur division. | नागपूर विभागातील पंधरा गावांमध्ये पोटहिस्सा मोजणीच्या कामाला सुरुवात

The work of counting the sub-shares has begun in fifteen villages of Nagpur division.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नकाशा व अधिकार अभिलेख संलग्न करण्यासोबतच प्रत्येक भूभागास अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्यासाठी नकाशाची पोटहिस्सा विभागणी हा महत्त्वाचा विषय प्रकल्प भूमी अभिलेख विभागातर्फे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये नागपूर विभागातील पंधरा गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती भूमी अभिलेख उपसंचालक डॉ. लालसिंग मिसाळ यांनी दिली.

पोटहिस्सा मोजणी व नकाशे अद्ययावतीकरण करणे हा प्रथमदर्शी प्रकल्प राज्यातील सहा विभागांतील १८ तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या पथदर्शी प्रकल्पामुळे सर्व्हे नंबर, गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटविषयाची मोजणी करणे अधिकार, अभिलेख सात-बारा व नकाशा अद्ययावत करून मिळेल तसेच प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक देणे हा या पथदर्शी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या पथदर्शी प्रकल्पामध्ये विभागातील नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील कुही, तुमसर व बल्लारपूर तालुक्यांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक तालुक्यातील पाच गावे याप्रमाणे पंधरा गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून पोटहिस्सा मोजणीबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे.

नकाशा आणि अधिकार अभिलेख सात-बारा अद्ययावत नसल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कृषीविषयक योजना, कृषी वित्तपुरवठा, नुकसानभरपाई देण्याच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पीक सर्वेक्षण प्रभावी आणि अचूक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतजमिनीच्या भूभागांचे धारक तसेच खातेनिहाय पोटविषयाची मोजणी करून पोटहिस्सा भूभागाची सीमा व क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकार अभिलेखे व नकाशे तंतोतंत ठेवणे आवश्यक आहे.

पंधरा गावांमध्ये पोटहिस्सा मोजणीच्या कामाला सुरुवात

विभागातील तीन तालुक्यांमधील पंधरा गावांमध्ये पोटहिस्सा मोजणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या दिशांची मोजणी करण्याच्या प्रस्तावासही मान्यता मिळाली असून, भूमी अभिलेख कार्यालयात एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या दिशांची मोजणी फी २०० रुपये प्रति पोटहिस्सा निश्चित करण्यात आली आहे.

Web Title : नागपुर विभाग के पंद्रह गांवों में भूमि उपखंड माप शुरू

Web Summary : नागपुर विभाग के पंद्रह गांवों में भूमि उपखंड माप शुरू हो गया है। परियोजना का उद्देश्य भूमि रिकॉर्ड, नक्शे को अद्यतन करना और अद्वितीय पहचान संख्या प्रदान करना है। इससे कृषि योजनाओं को सुव्यवस्थित किया जाएगा और किसानों के लिए सटीक भूमि डेटा सुनिश्चित किया जाएगा, जिससे सरकारी लाभों तक पहुंच में सुधार होगा।

Web Title : Land Subdivision Measurement Begins in Fifteen Villages of Nagpur Division

Web Summary : Nagpur division starts land subdivision measurement in fifteen villages. The project aims to update land records, maps and provide unique identification numbers. This will streamline agricultural schemes and ensure accurate land data for farmers, improving access to government benefits.