शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ई-वाहनांचा वेग ‘सुसाट' ! ४९ हजारांवर ईव्ही, ३०७ चार्जिंग स्टेशनचे मजबूत जाळे

By आनंद डेकाटे | Updated: April 2, 2026 19:44 IST

Nagpur : वाढते वायू प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांची वाढती जाणीव यामुळे नागपूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वाढते वायू प्रदूषण, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांची वाढती जाणीव यामुळे नागपूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सध्या तब्बल ४९,५६५ ई-वाहने रस्त्यांवर धावत असून, या वाढत्या प्रवाहाला बळ देण्यासाठी महावितरणने ३०७ सार्वजनिक ई-चार्जिंग स्टेशन्सचे मजबूत जाळे उभे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ई-प्रवास अधिक विश्वासार्ह आणि सुलभ बनला आहे.

महावितरणला राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत ‘नोडल एजन्सी’ म्हणून जबाबदारी दिली आहे. नागपूरसह राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण कमी करणे आणि ई-वाहनांचा वापर वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी प्राधान्याने वीजजोडणी देण्याबरोबरच खासगी उद्योजकांनाही या क्षेत्रात उतरवण्यासाठी महावितरणकडून तांत्रिक सहकार्य दिले जात आहे.

घरगुती वीजपुरवठ्यावर वाहन चार्जिंग शक्य असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासात किंवा तातडीच्या प्रसंगी फास्ट चार्जिंग स्टेशनची गरज महत्त्वाची ठरते. ही गरज लक्षात घेऊन शहरापासून ग्रामीण भागापर्यंत चार्जिंग पॉइंट्सचे जाळे विस्तारण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात वाढते ई-वाहनांचे प्रमाण आणि चार्जिंग सुविधांचे विस्तारलेले जाळे पाहता, शहर ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

विभागनिहाय चार्जिंग स्टेशनची संख्या

नागपूर शहर :
महाल - ८४
काँग्रेस नगर - ६६
सिव्हिल लाइन्स - ४५
बुटीबोरी - ४०
गांधीबाग - ७


नागपूर ग्रामीण
- मौदा -२६
- सावनेर - १६
- काटोल- ७
-उमरेड - ६

‘पॉवरअप ईव्ही’ ॲप ठरणार चालकांचा साथीदार

ई-वाहनधारकांना आता जवळचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी भटकंती करण्याची गरज उरलेली नाही. महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ मोबाइल ॲपच्या मदतीने चालकांना नकाशावर जवळचे स्टेशन सहज शोधता येते. याशिवाय स्लॉट बुकिंग, उपलब्धता तपासणी आणि सुलभ चार्जिंग या सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळत असल्याने ई-वाहनांचा वापर अधिक सोयीस्कर होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Embraces Electric Vehicles: Surging EV Adoption, Robust Charging Network.

Web Summary : Nagpur sees rapid adoption of EVs due to pollution concerns and rising fuel costs. Over 49,000 EVs are on roads, supported by 307 charging stations. MSEDCL facilitates charging infrastructure, promoting green mobility with its 'PowerUp EV' app for easy station locating and booking.
टॅग्स :nagpurनागपूरelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर