वेधशाळेचा अंदाज चुकला ! कुठेच बरसला नाही पाऊस, अवकाळीचे सावट कायम
By निशांत वानखेडे | Updated: May 4, 2026 19:14 IST2026-05-04T19:12:57+5:302026-05-04T19:14:00+5:30
Nagpur : विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दाेन दिवस मध्यम ते जाेरदार पाऊस हाेईल, असा वेधशाळेचा अंदाज साेमवारी चुकला. सायंकाळी ढगाळ वातावरण हाेते, पण कुठेही पावसाची नाेंद झाली नाही.

The observatory's forecast was wrong! No rain fell anywhere, the threat of unseasonal rain remains.
नागपूर : विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात दाेन दिवस मध्यम ते जाेरदार पाऊस हाेईल, असा वेधशाळेचा अंदाज साेमवारी चुकला. सायंकाळी ढगाळ वातावरण हाेते, पण कुठेही पावसाची नाेंद झाली नाही. उलट पारा वाढून उन्हाच्या चटक्यांनी छळ केला. मात्र २४ तासात अवकाळीचे ढग बरसतील, असा अंदाज कायम आहे.
शनिवारपासून असलेल्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे रविवारी तापमानात घट झाली हाेती. नागपूरचा पारा सरासरीच्या खाली येत ४१.८ अंशाची नाेंद झाली हाेती. मात्र साेमवारी त्यात १.४ अंशाची वाढ हाेत पारा ४३.२ अंशावर गेला. चंद्रपूरला तापमानात अंशत: घट हाेत ४३.४ अंशाची नाेंद झाली, पण जिल्ह्यात ब्रम्हपुरीचा पारा चढून ४४.४ अंशावर गेला, जी राज्यात सर्वाधिक नाेंद आहे. वर्धा, गडचिराेली, अकाेल्यात अंशत: वाढ हाेत ४३ च्यावर तापमान गेले आहे. अमरावती, वाशिम ४२ व इतर जिल्ह्यात पारा ४० अंशावर आहे.
हवामान विभागाने ३ ते ५ मे दरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण, वादळासह मध्यम ते जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज वर्तवला हाेता. वेधशाळेचा अंदाज आणखी २४ तासाकरीता कायम आहे. सध्याच्या निरीक्षणानुसार काही दिवस उनसावल्यांचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार मेच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा तीव्र त्रास हाेणार नाही. मात्र सूर्याचे उत्तरायण सुरू असल्याने व हा प्रवास महाराष्ट्रावरून हाेत असल्याने उन्हाचे चटके वाढतील, हे निश्चित मानले जात आहे.
गतवर्षी नवतपादरम्यान पावसाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. यावर्षीचा नवतपा तापवताे की दिलासा देताे, हे वातावरणाच्या बदलावरून दिसून येईल.