सोशल माध्यमांवर राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून टाकायचा प्रभाव; रियाजच्या पाठीशी राजकीय 'लिंक'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:04 IST2026-04-21T16:52:30+5:302026-04-21T17:04:31+5:30

Nagpur : कार्यालयातील तरुणीचा विनयभंग व धार्मिक दबाव प्रकरणातील अटकेत असलेला मो. रियाज मो. फाझील काझी याच्याकडून कुठले मोठे रॅकेट सुरू होते का याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

The impact of removing photos with political leaders on social media; Political 'links' behind Riyaz? | सोशल माध्यमांवर राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून टाकायचा प्रभाव; रियाजच्या पाठीशी राजकीय 'लिंक'?

The impact of removing photos with political leaders on social media; Political 'links' behind Riyaz?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कार्यालयातील तरुणीचा विनयभंग व धार्मिक दबाव प्रकरणातील अटकेत असलेला मो. रियाज मो. फाझील काझी याच्याकडून कुठले मोठे रॅकेट सुरू होते का याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाज हा स्वयंसेवी संस्था चालवत असला तरी तो राजकीय क्षेत्रातदेखील चांगलाच सक्रिय होता.

विशेषतः त्याच्या संस्थेला फंडिंग मिळविण्यासाठी तो राजकीय 'लिंक'चा वापर करायचा. सोशल माध्यमांवर राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून तो प्रभाव टाकायचा आणि माझे मोठे 'कॉन्टॅक्ट' असल्याचा कार्यालयात दावा करायचा. त्याचा संपर्क 'वरपर्यंत' असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार करायला इतके दिवस कुणी धजावले नव्हते. 

दरम्यान, एटीएसच्या पथकानेदेखील प्रकरणाची माहिती घेतली आहे. या काझी मानकापूरमध्ये 'युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी'च्या अंतर्गत फिकर फाउंडेशन व 'पढे हम-पढाए हम' या नावांनी स्वयंसेवी संस्था चालवतो. एमएसडब्ल्यू पदवीधारक असलेल्या काझीने २०१० मध्ये ही एनजीओ सुरू केली. या माध्यमातून तो वंचित मुलांना शिक्षणाशी जोडण्यासाठी काम केल्याचा दावा पोलिसांच्या चौकशीत केला आहे.

पोलिसांनी काझीच्या मोवाइलसह त्याच्या सोशल मीडिया खात्यांचीदेखील चाचपणी केली. त्यात काझीची 'शोबाजी' समोर आली आहे. नागपुरातील तसेच राज्यातील मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढून ते तो 'पोस्ट' करायचा. त्याच्या आधारावर त्याने प्रभाव टाकत संस्थेसाठी फंड जमा केल्याचा संशय आहे. त्याच्या वैयक्तिक आणि एनजीओच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. त्याला अनेक संस्थांकडून आर्थिक मदत मिळाल्याचे आढळून आले आहे. या संस्थांविषयी माहितीही गोळा केली जात आहे.

Web Title : छेड़छाड़ मामले में रियाज के राजनीतिक संबंध उजागर; क्या प्रभाव का इस्तेमाल किया?

Web Summary : छेड़छाड़ के आरोप में गिरफ्तार रियाज पर संभावित रैकेट के लिए जांच चल रही है। उसने फंडिंग और प्रभाव के लिए नेताओं के साथ तस्वीरें दिखाकर राजनीतिक संबंधों का लाभ उठाया, जिससे शिकायतें हतोत्साहित हुईं। अधिकारी उसकी वित्तीय और एनजीओ गतिविधियों की जांच कर रहे हैं।

Web Title : Riyaz's political links surface amidst molestation case; used influence?

Web Summary : Accused Riyaz, arrested in a molestation case, is under investigation for potential rackets. He leveraged political connections, flaunting photos with leaders for funding and influence, deterring complaints. Authorities are scrutinizing his finances and NGO activities.