शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ते धन काळेच

By admin | Updated: November 15, 2016 02:25 IST

अंबाझरी पोलिसांनी रविवारी रामनगरातील एका सदनिकेतून जप्त केलेली रक्कम ‘काळे धन’च असल्याचे

हिलटॉपमधील पावणेदोन कोटींची रोकड : प्राप्तीकर विभागाच्या हवाली नागपूर : अंबाझरी पोलिसांनी रविवारी रामनगरातील एका सदनिकेतून जप्त केलेली रक्कम ‘काळे धन’च असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या रकमेसह ताब्यात घेतलेल्या चौघांना प्राप्तीकर विभागाच्या हवाली केले आहे. आता या प्रकरणाची चौकशी प्राप्तीकर खात्याचे अधिकारी करणार आहेत. रामनगर हिलटॉपमधील अ‍ॅडव्होकेट सोसायटीच्या सदनिकेत कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना रविवारी कळली होती. त्याआधारे अंबाझरीचे द्वितीय निरीक्षक सतीश गोराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा घातला. सी-१६ क्रमांकाच्या सदनिकेत चार तरुण आढळले. त्यांच्याजवळ एक प्रवासी बॅग होती. बॅगमध्ये १००० आणि ५०० च्या नोटांची अनेक बंडले होती. या रकमेबाबत तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ही १ कोटी ८७ लाख ५० हजाराची रोकड आणि त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक सत्यनारायण अग्रवाल(वय ४५, रा. टेलिफोन एक्स्चेंज चौक), अरविंद अंबादास गवई (वय ४२, रा. संगम टॉकीजजवळ), अनिकेत मोहनदास कुमरे (वय २१, रा. कमाल चौकाजवळ, पाचपावली) आणि मयंकुमार मूलचंद शिवहरे (वय २४, रा. छावनी बांदा उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. रात्रभर या सर्वांची चौकशी केल्यानंतर या रकमेचा कोणत्या गुन्हेगार किंवा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अर्थात ही रोकड ‘काळे धन’च असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रोकड अन् चौघांना प्राप्तीकर खात्याच्या हवाली केले.(प्रतिनिधी) सीए आणि बिल्डर कनेक्शन ४विशेष म्हणजे, पोलिसांनी या संदर्भात अनेक बाबींचा उलगडा करण्याचे टाळले असले तरी शहरात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणातील अग्रवाल हे चाटर्ड अकाउंटंट (सीए) आहे. दुसरा अरविंद गवई शहरातील एका बड्या बिल्डरकडे व्यवस्थापक आहे. मयंककुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून तो अ‍ॅडव्होकेट सोसायटीत (जेथे रोकड पकडली) राहतो. या बाबी पुढे आल्यामुळे सीए आणि बिल्डर कनेक्शनही चर्चेला आले आहे.