शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र भावांना धडा शिकवा; लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू

By कमलेश वानखेडे | Updated: August 31, 2024 17:13 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : निवडणुकीत महायुतीला आशिर्वाद देण्याचे आवाहन

कमलेश वानखेडे

नागपूर : महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षा बंधनाला पैसे दिले, भाऊ बिजेला पण दिले जातील. हा माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढविली हात आखडता घेणार नाही. फक्त दीड हजारावर थांबणार नाही. ते दोन हजार, अडीच हजार, तीन हजार होतील. लाडकी बहिणीला  ओवाळणीची रक्कम वाढवत जावू, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहिण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तिजोरीतील पैसे  सर्वसामान्य  लोकांचे  आहेत. माझ्या बहिणींचे आहेत. त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू. करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे. ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता. तो पाळला.  

या योजनेचे सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडलेले आहे. ही लोकप्रिय झालेली योजना आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना फसवी आहे, जुमला आहे. पैसे येणार नाही, वाट बघत बसा, असे विरोधक म्हणायचे. सरकार पैसे काढून घेईल त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या म्हटले. पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले. ‘बुरी नजर वाले, तेरा मुह काला’ असा चिमटा घेत हे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते, हे बँकेत महिलांच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे. विरोधक कितीही काही म्हटले तरी ही योजना सरकार बंद होऊ देणार  नाही...  नाही...  नाही,  असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकीत  महायुतीच्या  पाठिशी  आपले  आशिर्वाद  ठेवा,  असे  आवाहनही  त्यांनी  लाडक्या  बहिणींना केले.  

सावत्र भावांना धडा शिकवाकाँग्रेस कार्यकर्ता अनिल वडपल्लीतर आडवाच पडणार आहे. योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेला आहे. हा कुणाचा आहे याची पार्श्वभूमी तपासा. उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय करणार नाही. विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली. आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले. या योजनेत खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. या सावत्र भावांना धडा शिकवा, असे आवाहान करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नेम साधला. 

आम्ही ‘सुरिक्षत बहिण’ देणारआम्ही सुरिक्षत बहिण देखील देणार, महिला अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सरकार कोर्टात करणार. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारमध्ये बसलेले भाऊ घेतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार