शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सावजी हॉटेल्स की बीयरबार?

By admin | Updated: May 26, 2017 02:49 IST

नागपुरातील सर्वच सावजी हॉटेल्स आणि लॉनमध्ये दारूची सर्रास विक्री आणि मालक पिण्यास परवानगी देत असल्याच्या प्राप्त माहितीवरून

फार्महाऊस किचन सावजी हॉटेलवर धाड : उत्पादन शुल्क विभागाची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील सर्वच सावजी हॉटेल्स आणि लॉनमध्ये दारूची सर्रास विक्री आणि मालक पिण्यास परवानगी देत असल्याच्या प्राप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री बजाजनगर येथील फार्महाऊस किचन सावजीवर धाड टाकली. कारवाईदरम्यान हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. बजाजनगर भागात अनेक सावजी हॉटेल्स आणि लॉन्स आहेत. सर्व ठिकाणी हॉटेलचे मालक ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी देतात आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. या भागातील लोकांना दारूड्यांचा त्रास होतो. यासंदर्भात लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केल्याची माहिती आहे. विभागाने मोहीम राबवून फार्महाऊस किचन सावजी हॉटेलसह या भागातील अन्य हॉटेलवरसुद्धा कारवाई केली. अधिकाऱ्यांनी हॉटेलमालकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महामार्गांवर होणारे अपघात लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्य व राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील बार व परमिट रूममधील दारूविक्रीवर प्रतिबंध लावले आहेत. आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानंतरही या हॉटेलमध्ये दारूविक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याआधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर धाड टाकली. विभागातर्फे ही मोहीम संपूर्ण शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.