शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्समध्ये रिटेलचे भविष्य

By admin | Updated: July 11, 2014 01:23 IST

आॅनलाईन विक्रीवर जागरूकता आणून नागपुरातील व्यापाऱ्यांना ईबेच्या माध्यमातून आपला व्यवसाय जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज आहे. स्पर्धेत व्यापाऱ्यांसमोर येणारी आव्हाने

ईबेच्या माध्यमातून विक्रीची संधी : ‘कॅट व ईबे’तर्फे कार्यशाळानागपूर : आॅनलाईन विक्रीवर जागरूकता आणून नागपुरातील व्यापाऱ्यांना ईबेच्या माध्यमातून आपला व्यवसाय जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज आहे. स्पर्धेत व्यापाऱ्यांसमोर येणारी आव्हाने आधुनिकीकरणाच्या माध्यमातून त्यांनाच सोडवायची आहे. आधुनिक व्यवसायासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनी सक्षम व्हावे, असे आवाहन विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येथे केले. व्यापाऱ्यांमध्ये आॅनलाईन विक्रीबद्दल जागरूकता वाढीस लागावी यासाठी कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि ईबे इंडिया यांनी एकत्रितपणे ई-कॉमर्स जागरूकता कार्यशाळेचे आयोजन नुकतेच केले. रिटेल आयात आणि देशांतर्गत ईबेच्या माध्यमातून ई-कॉमर्सच्या उपलब्ध विक्रीच्या संधीची विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, सचिव प्रवीण खंडेलवाल, नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, ईबे इंडियाच्या स्ट्रेटेजिक अलायन्स विभागाचे प्रमुख पंकज उके उपस्थित होते. याप्रसंगी विविध विषयावर विचारमंथन करण्यात आले. ईबे इंडिया व कॅटमध्ये करारभारतीय व्यापाऱ्यांना आधुनिक विचार देणे व त्यांना शिक्षित करण्याचे उद्दिष्ट बाळगून ईबे इंडिया आणि कॅट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी कॅटच्या रिटेल स्कूलमध्ये ई-कॉमर्स सेंटर आॅफ एक्सलन्स (सीओई) उभारण्यात आले आहे. सीओईने भारतातील व्यापाऱ्यांसाठी एक देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय पातळीवर जागृती अभियान ईबे आणि कॅट संयुक्तपणे करणार आहे. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना ईबेद्वारे तब्बल २०१ देशांत आणि भारतातल्या ४,३०६ ठिकाणे रिटेल आयात करता येणार आहे. या मोहिमेमुळे व्यापारी प्रत्यक्ष दुकानातून चालणारा व्यापार अबाधित ठेवून अतिरिक्त व्यापार माध्यम असलेल्या आॅनलाईन देशांतर्गत बाजारपेठेत आपापला व्यापार अधिक सक्षम बनवू शकतील.व्यापाऱ्यांना प्रोत्साहनबी.सी. भरतीया यांनी सांगितले की, ईबेसारख्या बाजारपेठांमार्फत ई-कॉमर्स केल्याने भारतीय व्यापाऱ्यांना कमीत कमी गुंतवणूक करून वैयक्तिकरीत्या आपापला व्यापार वाढविण्याच्या मुबलक संधी मिळतील. रिटेल आयातीमार्फत आपला व्यवसाय केवळ देशच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा वाढू शकतो, याबात भारतीय व्यापाऱ्यांचे डोळे उघडण्याचे काम या कार्यशाळेने केले आहे. (प्रतिनिधी)ईबे देशातील आॅनलाईन बाजारपेठईबे ही देशातील आघाडीची आॅनलाईन बाजारपेठ असून देशातील ४,३०६ महानगरे, शहरे आणि गावांमध्ये ईबेचे २१ लाख अ‍ॅटिव्ह यूजर्स आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून ईबे इंडिया या बाजारपेठेच्या माध्यामातून व्यापाऱ्यांना त्याच्या विक्रीचा आकडा वाढविण्यात चालना देत आहे. सध्या ईबे इंडियावर ३० हजार व्यापारी देशभर विक्री करीत असून १५ हजार व्यापारी रिटेल आयात संधीद्वारे जगभरातल्या १२.८ कोटी ग्राहकांकडे विक्री करीत आहे. भारतीय उद्योजकांनी इलेक्ट्रॉनिक्स, लाईफस्टाईल तसेच विविध श्रेणींमधल्या वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. तसेच कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडया ट्रेडर्स ही भारतातील व्यापाऱ्यांची एक प्रतिनिधिक संस्था असून जागतिक आव्हानांना सामोर जाण्यासाठी भारतीय रिटेल व्यापाराला सक्षम बनविणे हे या संस्थेचे ध्येय आहे.