शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

एमएसपी दराने धान विकण्यासाठी नोंदणी मुदत ३१ डिसेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:58 IST

शासकीय धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ : शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क 
रामटेक :
शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दराने धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे अनिवार्य आहे. पूर्वी या नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत ठरविण्यात आली होती. या नोंदणीला शासनाने मुदतवाढ दिली असून, आता शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


पणन मंडळाने रामटेक तालुक्यात तालुका खरेदी-विक्री संघाला धान खरेदी एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. या संघाचे आधीच्या वर्षीच्या कमिशनचे ८० लाख रुपये पणन मंडळाकडे थकीत आहेत. ती रक्कम दिल्याशिवाय आपण खरेदी केंद्र सुरू करणार नाही, अशी भूमिका खरेदी विक्री संघाने घेतल्याने पेच निर्माण झाला होता. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने पेच सुटण्यास थोडी मदत झाली. त्यामुळे खरेदी विक्री संघाने सध्या रामटेक तालुक्यात चार ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


या तिढ्यामुळे पणनकडील नोंदणी प्रक्रिया रखडली होती. ती काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली. कमी काळात अधिक नोंदणी करणे शक्य नसल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशान्वये या नोंदणीला ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 


पणन महामंडळाच्या धान खरेदीला सुरुवात कधी? 
रामटेक तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महामंडळ या दोन संस्थांच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने धानाची खरेदी करते. त्याअनुषंगाने या दोन्ही संस्थांनी आधी नोंदणी करायला सुरुवात केली. आदिवासी विकास महामंडळाने त्यांच्या तीनपैकी दोन खरेदी केंद्र सुरू करून खरेदीला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी पणन महामंडळाकडे नोंदणी केली आहे. परंतु, त्यांनी अद्यापही खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे त्यांची धान खरेदी नेमकी कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकयांनी उपस्थित केला आहे.


९७५ शेतकऱ्यांची नोंदणी 
तालुका खरेदी-विक्री संघात आतापर्यंत ९७५ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रोज संघाच्या कार्यालयात गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि गोदामाची समस्या यामुळे धान खरेदी सुरू करण्यास विलंब होत असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. शेतकऱ्यांची गर्दी कमी झाली की, धान खरेदी सुरू करण्यात येईल, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे सचिव प्रशांत बोरकर यांनी दिली.


"आदिवासी विकास महामंडळाने त्यांच्या पवनी व डोंगरी येथील खरेदी केंद्रांवर आतापर्यंत प्रतिक्विंटल २,३०० रुपये ११ शेतकऱ्यांकडून ७१६.८० क्विंटल धान खरेदी केला आहे. या धानाची एकूण किमत १६ लाख ४८ हजार ६४० रुपये आहे."
- सुखदेव कोल्हे, सहायक उपनिबंधक, रामटेक

टॅग्स :MSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर