गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुजारी व पाशाला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 15, 2026 17:38 IST2026-05-15T17:37:36+5:302026-05-15T17:38:35+5:30

विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय : प्रत्येकी एकूण ३५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला

Priest and Pasha sentenced to five years in prison for threatening to kill Gadkari | गडकरी यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पुजारी व पाशाला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

Priest and Pasha sentenced to five years in prison for threatening to kill Gadkari

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटी रुपयांच्या खंडणीकरिता ठार मारण्याची धमकी देणारे कुख्यात गुन्हेगार जयेश ऊर्फ जयेशकांत ऊर्फ शाहीर ऊर्फ शाकीर शशिकांत पुजारी व अफसर पाशा उर्फ बशीरोद्दीन ऊर्फ खुशीरोद्दीन यांना विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली व प्रत्येकी एकूण ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी हा निर्णय दिला.

हे दोघेही अन्य गुन्ह्यांमध्ये कर्नाटकमधील बेळगाव येथील हिडलंगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांनी तेथेच गडकरी यांना खंडणी मागण्याचा कट रचला होता. पुजारीने १४ जानेवारी व २१ मार्च २०२३ रोजी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून पहिल्यावेळी १०० कोटी तर, दुसऱ्यावेळी १० कोटी रुपयाची खंडणी मागितली होती. तसेच, ही रक्कम दिली नाही तर, गडकरी यांची हत्या करू आणि बॉम्बस्फोट घडवून त्यांचे कार्यालय उडवून देऊ, अशी धमकी दिली होती. या गुन्ह्यामध्ये मोहम्मद शाकीर मोहम्मद हनीफ हा तिसरा आरोपी असून तो फरार आहे. अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात स्वतंत्र खटला चालवला जाईल. न्यायालयात सरकारच्यावतीने ॲड. वेदिका पाटील व ॲड. लीलाधर शेंदरे, तर आरोपींतर्फे ॲड. हेमंत झा, ॲड. उन्नती बोबडे व ॲड. आर.पी. ढाले यांनी कामकाज पाहिले.

अशी आहे पूर्ण शिक्षा

१) खंडणीसाठी हत्येची धमकी (भादंवि कलम ३८७) : पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
२) ठार मारण्याची धमकी देणे (भादंवि कलम ५०६-२) : पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
३) बेकायदा कारवाया करणे (यूएपीए कलम १३-१) : पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
४) दहशतवादी कृत्यांसाठी साहाय्य (यूएपीए कलम १८) : पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
५) ओळख लपवून धमकी देणे (भादंवि कलम ५०७) : दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा महिने अतिरिक्त कारावास.
६) खंडणीसाठी दहशत निर्माण (भादंवि कलम ३८५) : दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा महिने अतिरिक्त कारावास.
७) बेकायदा संघटनेचा सदस्य (यूएपीए कलम १०) : दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा महिने अतिरिक्त कारावास.

Web Title : गडकरी धमकी मामला: जबरन वसूली करने वाले जयेश पुजारी और पाशा को जेल।

Web Summary : नितिन गडकरी को जबरन वसूली के लिए धमकाने पर जयेश पुजारी और अफसार पाशा को पांच साल की सजा। उन्होंने जेल में इसकी योजना बनाई, करोड़ों की मांग की और हत्या की धमकी दी। एक और आरोपी फरार है।

Web Title : Gadkari Threat Case: Jail for extortionists Jayesh Pujari and Pasha.

Web Summary : Jayesh Pujari and Afsar Pasha get five years for threatening Nitin Gadkari over extortion. They planned it in jail, demanding crores and threatening murder. Another accused is absconding.