Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार

अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार

Adani Group Updates: या घडामोडीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अदानी समूहाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 06:51 IST2026-05-16T06:50:12+5:302026-05-16T06:51:02+5:30

Adani Group Updates: या घडामोडीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अदानी समूहाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Big relief for Adani in US; Adani family to pay $18 million fine | अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार

अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार

न्यूयॉर्क : उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकेत सुरू असलेल्या कायदेशीर चौकशीत मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) नागरी स्वरूपातील प्रकरणात तडजोड केली असून, आता अमेरिकेचा न्याय विभाग आणि ट्रेझरी विभागाची चौकशीही अंतिम टप्प्यात आहे. 

या घडामोडीमुळे गेल्या काही महिन्यांपासून दबावाखाली असलेल्या अदानी समूहाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

इराणशी संबंधित प्रकरणातही दिलासा? 

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाकडून इराणी एलपीजी आयातीसंदर्भात सुरू असलेली स्वतंत्र चौकशीही अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अदानी समूहाशी संबंधित जहाजाद्वारे इराणी एलपीजी आयात केल्याच्या संशयावरून ही चौकशी सुरू होती.

आरोप मान्य केले नाहीत

एसईसीच्या नोंदीनुसार, गौतम अदानी यांनी ६ दशलक्ष डॉलर, तर त्यांचे पुतणे सागर अदानी यांनी १२ दशलक्ष डॉलर दंड भरण्यास सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हे आरोप मान्यही केले नाहीत आणि फेटाळलेही नाहीत. गौतम अदानींवर थेट लाचखोरीचे आरोप नव्हते; त्यांच्यावर सिक्युरिटीज फसवणूक आणि वायर फसवणुकीची कलमे होती.

आरोप काय होते? 

नोव्हेंबर २०२४ मध्ये एसईसीने दाखल केलेल्या प्रकरणात सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,२७० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच अमेरिकन गुंतवणूकदार आणि बँकांकडून निधी उभारताना ही माहिती लपविल्याचाही दावा करण्यात आला.

Web Title : अडानी को अमेरिका में राहत: परिवार 1.8 करोड़ डॉलर का जुर्माना भरेगा

Web Summary : अडानी समूह को अमेरिकी कानूनी जांच में राहत मिली है, क्योंकि एसईसी के साथ समझौता हो गया है। परिवार भारत में रिश्वतखोरी के आरोपों और अमेरिकी निवेशकों से जानकारी छिपाने के संबंध में आरोप स्वीकार किए बिना 1.8 करोड़ डॉलर का जुर्माना भरेगा, जिससे निवेशकों का विश्वास फिर से बहाल हो सकता है।

Web Title : Adani Gets US Relief: Family to Pay $18 Million Fine

Web Summary : Adani Group sees relief in the US legal probe as a settlement with SEC is reached. The family will pay $18 million fine without admitting or denying the charges related to bribery allegations in India and concealing information from US investors, potentially restoring investor confidence.