मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 05:54 IST2026-05-16T05:51:45+5:302026-05-16T05:54:26+5:30

या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या सहपोलिस आयुक्त (प्रशासन) सुवेझ हक तर आर्थिक गुन्हे येथे राजेश प्रधान या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai's law and order is under Manoj Kumar Sharma, traffic under Satyanarayan, crime under Kumbhar | मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 

मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 

मुंबई : ट्वेल्थ फेल ते आयपीएस अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास असलेले मनोजकुमार शर्मा यांच्यावर गृहविभागाने मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची सह आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली आहे. सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची सहपोलीस आयुक्त (वाहतूक) तर अनिल कुंभारे यांची सह पोलिस आयुक्त (गुन्हे) अशी बदली करण्यात आली.

मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागातील विशेष पोलिस महानिरीक्षक, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार यांच्याकडे फोर्स वनचे विशेष पोलिस महानिरीक्षक,  सहपोलिस आयुक्त (आर्थिक गुन्हे) निशिथ मिश्रा यांच्याकडे विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण) या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

या बदल्यांमुळे रिक्त झालेल्या सहपोलिस आयुक्त (प्रशासन) सुवेझ हक तर आर्थिक गुन्हे येथे राजेश प्रधान या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील पोलीस उपायुक्त संदीप जाधव, अकबर पठाण,महेश चिमटे, मितेश घट्टे, विशाल ठाकूर, वैशाली शिंदे यांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली. 

Web Title : मुंबई पुलिस में फेरबदल: मनोज कुमार शर्मा को कानून व्यवस्था का जिम्मा।

Web Summary : मुंबई पुलिस में बड़ा फेरबदल। मनोज कुमार शर्मा को कानून व्यवस्था का जिम्मा। सत्यनारायण को यातायात, अनिल कुंभार को अपराध शाखा। कई डीसीपी का तबादला।

Web Title : Mumbai Police reshuffle: Manoj Kumar Sharma heads Law & Order.

Web Summary : Mumbai Police sees major reshuffle. Manoj Kumar Sharma takes charge of Law & Order. Satyaranayan heads traffic, Anil Kumbhare crime branch. Several DCPs transferred.