शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था

By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 00:51 IST

नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

नागपूर : प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक रेल्वेगाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावत आहेत. रविवारी दिवसभरात प्रयागराज येथून ३३० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून १२ लाख, ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत १९१ गाड्यांमधून ८ लाख, १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विानयक गर्ग तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकारांना दिली.प्रयागराजमध्ये भाविक प्रचंड संख्येत जमा झाल्यामुळे तेथे ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाल्याचे सचित्र वृत्त चोहोबाजूने येत आहे. वाहतुक व्यवस्था कोलमडल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य आणि दपूम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी तडकाफडकी स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन रेल्वे प्रवासी आणि स्थिती विशद केली. प्रयागराजमध्ये एकूण ८ रेल्वे स्थानक असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातून ३० हजार प्रवासीनागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

तिकीट तपासणीची विशेष मोहीमप्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी प्रवास करीत आहे. त्यांच्यामुळे तिकीट काढून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते लक्षात घेता मंगळवारपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीने कुंभमेळा स्पेशल ट्रेनमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.प्रवाशांना आवाहन - २६ फेब्रुवारीपर्यंत नागपूरहून आणखी काही रेल्वे गाड्या चालविण्याचा विचार आहे. कुंभमेळाकरिता प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. मात्र, सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे