शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता

By योगेश पांडे | Updated: May 8, 2025 00:33 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर राबवत असताना नागरी वस्त्यांमध्ये थेट नुकसान न होता, केवळ दहशतवाद्यांच्या कॅम्प्सला टार्गेट करण्याचे मोठे आव्हान वायुदलासमोर होते. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधारे वायुदलाच्या वैमानिकांनी ते सहज शक्य करून दाखविले.

- योगेश पांडे नागपूर - ऑपरेशन सिंदूर राबवत असताना नागरी वस्त्यांमध्ये थेट नुकसान न होता, केवळ दहशतवाद्यांच्या कॅम्प्सला टार्गेट करण्याचे मोठे आव्हान वायुदलासमोर होते. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या आधारे वायुदलाच्या वैमानिकांनी ते सहज शक्य करून दाखविले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ‘एलएमएस’चा (लॉईटरिंग म्युनिशन्स सिस्टम) वापर झाला. त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आले. भारतीय सैन्याला नागपुरातूनदेखील या ‘एलएमएस’चे बळ मिळते व नागास्त्र-१ च्या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. गोपनीयता बाळगायची असल्याने संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजच्या ‘इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड’द्वारे ‘एलएमएस’चे उत्पादन होते. भारतीय सैन्याच्या शस्त्रसामुग्रीत ‘नागास्त्र-१’ व ‘नागास्त्र-२’चा समावेश आहे. आत्मघाती ड्रोन अशी यांची ओळख असून याचा उपयोग अशा ऑपरेशन्समध्ये हमखास करण्यात येतो. ही मानवरहित ड्रोन्स टार्गेट भागाची टेहळणी करण्यासाठी, समोरील धोके ओळखण्यासाठी व वेळ पडली तर पारंपरिक क्षेपणास्त्रांप्रमाणे टार्गेट उडविण्यासाठीदेखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. ‘नागास्त्र-१’ व ‘नागास्त्र-२’मुळे प्रत्यक्ष ऑपरेशन्सदरम्यान नुकसान होण्याचा धोका कमी होतो. या ‘एलएमएस’ प्रणालीला कॅमिझाके ड्रोन अशीदेखील ओळख आहे. भारतीय सैन्यदलात पोलंडच्या डब्लूबी ग्रुपचे वॉरमेट तसेच नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजच्या नागास्त्र-१ चा शस्त्रसामुग्रीत समावेश केला आहे. त्याचाच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापर झाल्याची दाट शक्यता असल्याची माहिती संरक्षण तज्ज्ञांनी दिली आहे.

‘नागास्त्र-१’मध्ये ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानसोलार इंडस्ट्रीजतर्फे उत्पादित ‘नागास्त्र-१’च्या माध्यमातून ‘रिअल टाईम’ टेहळणी शक्य होते. त्याचप्रमाणे यात स्फोटकांचे पेलोडदेखील वाहून नेण्याची क्षमता आहे. २०२४ मध्ये सोलार इंडस्ट्रीजने भारतीय लष्करासोबत चारशेहून अधिक ‘नागास्त्र-१’चा पुरवठा करण्याचा करार केला होता.

‘नागास्त्र-१’ची क्षमता- नागास्त्र-१ अत्यंत थंड किंवा जास्त उंचीच्या परिस्थितीतही काम करण्यास सक्षम आहे.- या ड्रोनची रेंज सुमारे ३० किमी आहे- त्याच्या इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टममुळे, नागास्त्र-१ चे ध्वनी संकेत कमी आवाजाचे आहेत.- हे ड्रोन दिवसा आणि रात्री देखरेख कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे- लहान टार्गेट्सना निष्प्रभ करण्यासाठी एक ते दीड किलो वजनाचे स्फोटक वॉरहेड वाहून नेऊ शकते.- मोहीम रद्द झाली तर पॅराशूट रिकव्हरी सिस्टम वापरून सहज खाली उतरवता येते- नागास्त्र-१ मधील बहुतांश साहित्य स्वदेशी

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाnagpurनागपूर