शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बिंग फुटेल म्हणून भाजपकडून आयुक्त मुंढे टार्गेट; नितीन राऊत यांनी केली पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 04:54 IST

मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे.

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व भाजप यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात आता राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी उडी घेतली आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला आपले बिंग फुटण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अख्खी भाजप मुंढे यांना लक्ष्य करीत आहेत, अशी टीका करीत राऊत यांनी मुंढे यांची उघड पाठराखण केली आहे.राऊत म्हणाले, मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे. मुंढे हे प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत आहेत. ते ज्या शहरात जातात तेथे आपले प्रशासकीय कसब वापरून त्या शहराच्या विकासासाठी काम करतात. ते कुठल्याही व्यक्तिगत हितासाठी काम करत नाहीत. नागपुरात त्यांची नियुक्ती महाविकास आघाडी सरकारने केली आहे.शहराच्या विकासाला गती देण्यासाठीच त्यांना नागपुरात आणण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या एका पक्षाने नागपुरात आणले अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.सीईओ म्हणून नियुक्ती वैधच : स्मार्ट सिटीच्या संदर्भात महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांची पोलिसात तक्रार केली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. मात्र, या दोन्ही तक्रारीत तथ्य नाही. सीईओच्या रिक्तपदी नियुक्ती करण्याचे अधिकार त्या मंडळाला आहेत. त्याचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आहेत. त्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून पालिकेच्या आयुक्तांना अधिकार दिले. त्यामुळे स्मार्ट सिटीचा कारभार ते पाहात आहेत. सीईओची नियमित नियुक्ती करण्यासाठी बोर्डाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरNitin Rautनितीन राऊतBJPभाजपा