Stock Market Today: आज(दि.२०) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात झाली. प्रमुख निर्देशांक BSE Sensex आणि NSE Nifty 50 हिरव्या रंगावर उघडले. ३० समभागांचा सेन्सेक्स १३९.३६ अंकांनी (०.१८%) वाढून ७८,६३२.९० या पातळीवर उघडला. तर, निफ्टीनेही ३७.९५ अंकांची (०.१६%) वाढ नोंदवत २४,३९१.५० वर सुरुवात केली. सकाळी सुमारे १०:३० वाजेपर्यंत सेन्सेक्स ३१३ अंकांच्या वाढीसह ७८,८०७ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी ८२ अंकांनी वाढून २४,४३५ वर ट्रेड करत आहे.
टॉप गेनर्स आणि लूजर्स
बीएसईतील प्रमुख वाढ करणाऱ्या समभागांमध्ये ट्रेंट, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट्स आणि एलअँडटी यांचा समावेश होता. तर घसरण झालेल्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स आणि टाटा स्टील यांचा समावेश होता.
शुक्रवारी बाजाराची स्थिती कशी होती?
शुक्रवार (१७ एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५०४.८६ अंकांनी (०.६५%) वाढून ७८,४९३.५४ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० १५६.८० अंकांनी (०.६५%) वाढून २४,३५३.५५ या पातळीवर बंद झाला. त्या दिवशी पॉवरग्रिड, रिलायन्स, अदानी पोर्ट्स, टायटन आणि टेक महिंद्रा हे टॉप गेनर्स होते. तर सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, एलअँडटी आणि एटरनल हे टॉप लूजर्स ठरले होते.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market opened positively, with Sensex and Nifty gaining. Top gainers included Trent, SBI, and ICICI Bank. HDFC Bank and Reliance were among the losers. On Friday, the market also closed higher.
Web Summary : भारतीय शेयर बाजार सकारात्मक रूप से खुला, सेंसेक्स और निफ्टी में बढ़त हुई। ट्रेंट, एसबीआई और आईसीआईसीआई बैंक टॉप गेनर्स में शामिल थे। एचडीएफसी बैंक और रिलायंस हारने वालों में थे। शुक्रवार को भी बाजार तेजी के साथ बंद हुआ।